रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्ष उद्दिष्टापासून का ढासळला ?

‘आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आíथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. ’ भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ६

त्यानंतरचा बराचसा वेळ राज्यघटना निर्मितीत गेला. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान कोणते होते हे खुद्द घटना समितीने आणि मसुदा समितीतील मान्यवर सदस्यांनीच नोंदवून ठेवलेले आहे. अरुण शौरी सारख्या राजकीय पदावर डोळा ठेवून लेखन करणाऱ्या लेखकाच्या शिफारशीची त्यासाठी काही आवश्यकता नाही. ज्या हेतूने अरुण शौरीनी ‘वर्शिपिंग फॉल्स गॉड’ हा ग्रंथ लिहिला तो हेतू ते राज्यसभेचे सदस्य झाल्याने पूर्ण झाला. परंतु या […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ५

रिपब्लिकन पक्षाची अधिकृत स्थापना दि. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली असली, तरी त्याला साधारणतः १९२४ सालच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या स्थापनेपासूनची परंपरा आहे. या परंपरेच्या पार्श्वभूमीनेच त्याला काही व्यापक आणि महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत. या पूर्वी सांगितल्या प्रमाणे, बाबासाहेबांना भारतीय समाजाला आधुनिक जगाशी, त्याच्या आधुनिक समाज आणि राजकीय व्यवस्थेशी, त्याच्या आधुनिक जीवनमूल्यांशी संवादी बनवायचे होते. त्यासाठी पोषक असे वैचारिक […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ४

त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याची, त्याची चिकित्सा करण्याची आंबेडकरांच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण दिसते. त्यांनी १९१९ साली साऊथबरो कमिशनला सादर केलेल्या अहवालापासून ते १९५५ साली भाषावार प्रांतरचनेच्या संबंधी व्यक्त केलेल्या मतापर्यँत व्यवहारिक, तांत्रिक गोष्टीसंबंधी आणि राष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी जी मते बांधलेली आहेत, त्यांना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक असा तीन पाटल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांबरोबर  वादविवाद करणे सोपे नव्हते. त्यांच्याप्रती […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ३

बाबासाहेबांना कोणत्याही क्षुद्र गोष्टींचे कधी आकर्षणच नव्हते. जे अर्थपूर्ण, जे सर्वश्रेष्ठ आणि जे कल्याणकारी त्याचा जणू ध्यासच त्यांच्या मनाने घेतलेला होता. त्यांच्या काळात जगातील एक श्रेष्ठ दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून एडविन आरए.सेलिग्मन प्रसिद्ध होते. ते तर त्यांचे शिक्षकच होते. त्यांच्याकडून अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा कण न कण ग्रहण करण्यासाठी बाबासाहेब त्यांच्या प्रत्येक व्याख्यानमाला कसे अक्षरश: धावत जात होते […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – २

रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या स्वरूपाची आणि त्याच्या भवितव्याची चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेमागील प्रयोजन आणि त्याच्या संस्थापकांचा व्यक्तिमत्वाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय हि चर्चा कल्याणकारी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. तसे करणे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचा देदीप्यमान वारसा समजून घेणे होय, ज्यांना तो वारसा नीट माहित नसतो त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकणार नाही. या वारशाचा […]

रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – १

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिलेलं शेवटचं राजकीय हत्यार आहे. या हत्याराचा प्रभावीपणे उपयोग करून भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात लोकशाहीच्या आणि अहिंसक मार्गाने क्रांतिकारी परिवर्तन केले जाईल असा विश्वास वाटत होता. या राजकीय पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या प्रकारे अतूट संबंध असल्याने भारतातील प्रत्येक प्रांतात या पक्षाबद्दल ममत्व […]