
जेव्हा इंदुमती वराळे यांच्या सुमधूर आवाजानं पाणावले होते बाबासाहेबांचे डोळे!
युगानुयुगे अन्याय, अत्याचार, गुलामगिरी आणि विषमतेच्या खाईत होरपळणाऱ्या मानवतेसाठी १४ ऑक्टोबर १९५६ ची ती मंगलमय पहाट एक नवी क्रांती घेऊन उगवली होती. नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षाभूमीवर अवघ्या भीमभूमीचा आणि मानवतेचा इतिहास बदलणारा तो सुवर्णक्षण होता. या अद्भूत आणि पवित्र सोहळ्याला लाभली होती ती नागपूरच्याच सुपुत्री, गायिका इंदुमती वराळे यांच्या सुमधूर स्वागत गीताची भावनात्मक आणि हृदयस्पर्शी किनार! […]
सम्राट अशोक राजाची ज्ञात नसलेल्या मुलीबद्दल जाणून घ्या
बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. […]
बोधिसत्त्व म्हणजे काय व कोनाला म्हणावे ?
तथागत गौतम बुद्ध हे बोधिसत्व कसे झाले व त्याना ते पद कसे प्राप्त झाले या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहीतात, ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ ‘बोधिसत्त्व’ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले. बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व. बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्त्व हा क्रमाने […]
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी बौद्ध लेणी
भारतातील महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात कोळकेवाडी गाव आहे आणि या गावाच्या पाठी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एका टोकावर हि बौद्ध लेणी आहेत इतिहास : साधारणपणे ह्या लेण्यांचा इतिहास सापडत नसला तरी ती बौद्ध लेणी असल्याचे अवशेष मात्र या लेण्यावर आहेत काहींच्या मते हि लेणी शिलहार राजांच्या काळात बांधली असे म्हटले जाते पण याला पुरावा नाही हि लेणी अतिप्राचीन लेणी वाटतात कोकणातील सर्वात जुनी लेणी म्हणून कोळकेवाडी लेण्यांचा उल्लेख करावा वाटतो . पितळखोरा लेणी हि सर्वात प्राचीन लेणी आहेत त्या लेण्या साधारण इसवी सन पूर्व दुसरे शतक या मध्ये बांधलेली आहेत याच गोष्टीचा आधार घेत कोळकेवाडी इथली लेणी हिशिरवळ लेणी
डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला 'दगोबा' किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा स्वरूपाची बैठक व्यवस्था केलेली आहे. शेजारील लेणीत पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर कोपऱ्यातील लेण्यांत छोटेसे मंदिर असून त्याच्या वरील बाजूस एक लेणी असून त्यातही पाणी असते. शिरवळ लेणी १५ बौद्ध लेणींपैकी एक असून ती पुणे पासून ४८ किलोमीटर अंतरावर, शिरवळ नावाच्या लहान खेड्यात आहे. यात एक चैत्य आहे आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्वकाळाच्या ओघात दुर्लक्षित ठाणाळे लेणी
काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचे..अष्टविनायकातील पाली गावाच्या जवळच रायगड-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली हि लनी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे . या लेण्यांचा काळ इ.स. पूर्व दुसरे शतक . त्याकाळी कोकणातील चौल हे व्यापाराचे बंदर होते. हा माल अलिबाग वरून पाली-सुधागड मार्गे नाडसूर-ठाणाळे इथवर येत असे..येथून तो देशावर पोहोचवला जात असे..या प्राचीन मार्गावरील डोंगर कापारीत ठाणाळे लेणी कोरलेली आहेत.त्यामुळे त्यांना पूर्वी पुष्कळ महत्व होते . बौद्ध भिक्खुंचे तांडे वर्षाकाळात ठाणाळे लेण्यातील विहारात वास करीत.सन १८९० मध्ये लेफ्ट.रेव्ह.जे.अ.एबर यांनी हि लेणी शोधून काढली पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गेमहाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी
खूपच कमी लोकांना माहीत असलेली महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी. महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास पाहता सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी मधील शिलालेख असून लेखामध्ये कोणत्याही ज्ञात राजवंश उल्लेख केलेला नाही तरी साधारण भाषा लिपी व लेण्यांचे बांधकाम शैलीवरून हि लेणी सातवाहन काळात कोरलेली आहेत यात शंका नाही.या लेण्यांचा इतिहास पाहता हि सातवाहन कालीन लेणी आहेत गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या अधिपत्याखाली अपरांत संघराज्य होते. नहपान राजाकडून अपरांत गौतमी पुत्र सातकर्णी ने आपल्या अधिपत्याखाली घेतले होते.याच वेळी भारतातगांधारपाले लेणी
गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाड जवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहेत. यांचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. ही लेणी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर महाडच्या उत्तरेस ३ किमी अंतररावर असलेल्या डोंगरात कोरलेली आहेत. हा एकूण ३० लेण्यांचा समुह असुन ३ चैत्यगृह व १९ विहार आहेत. लेणे क्र.१ मधे ५३ फुट लांब व ८ फुट रुंद ओसरी आहे. गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मुर्ती व धम्मचक्र कोरलेलीखापरा कोडिया लेणी
खापरा कोडिया लेणी जुनागड बौद्ध गुहा समूहाचा भाग आहेत. या समूहातील लेण्यांपैकी ती सर्वात जुनी लेणी आहेत. भिंतीवरील अक्षरे व लहान अक्षरांच्या आधारे ही लेणी सम्राट अशोकाच्या राजवटीतील ख्रिस्तपूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकातील असून समूहातील सर्व लेण्यांपैकी सर्वांत सरळ लेणी आहेत. या लेण्यांना खंगार महाल असेही म्हणतात. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत ते खडकात कोरले गेले आणि या भागातील सर्वात प्राचीन मठाधीश वसाहत मानली जाते. या लेण्या प्राचीन सुदर्शन तलावाच्या काठावर (जे आता अस्तित्वात नाही) आणि उत्तरेला उपरकोट किल्ल्याच्या थोड्या बाहेर आहेत. या लेण्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत कोरलेल्या आहेत. ते क्षेत्रफळाने लहान आहेत. पण पाण्याच्या टाक्यांची वास्तू अनोखी असून लेण्या एल आकाराचे निवासस्थान बनवतात. वासा काळात भिक्कूंनी लेण्यांचा वापर केला. अनेक वर्षांच्या वापरानंतर, लेण्यांमधील दरारांमुळेRecent News
- जेव्हा इंदुमती वराळे यांच्या सुमधूर आवाजानं पाणावले होते बाबासाहेबांचे डोळे! October 14, 2026
- सम्राट अशोक राजाची ज्ञात नसलेल्या मुलीबद्दल जाणून घ्या October 14, 2026
- रिपब्लिकन पक्ष उद्दिष्टापासून का ढासळला ? October 14, 2026
- रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ६ October 14, 2026
- रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – ५ October 14, 2026














