डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे नवीन वसतिगृह सुरु करण्या करीता भेट दिली. त्या वेळी स्टेशनवर काँग्रेस च्या लोकांतर्फे त्यांना काळी निशाणे दाखविण्यात आलीत. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात गोलमेज परिषदेच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. गांधी, जीना, सप्रू आदी सदस्यांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या वेळी त्यांना ” फेडरल स्ट्रक्चर कमिटी” चे सदस्य म्हणून नेमण्यात आले. या महत्वाच्या समिती कडे भारताच्या घटनेचा मसुदा तयार करण्याचे दिले होते.
आंबेडकरांच्या नियुक्तीची बातमी पसरताक्षणीच त्यांच्यावर देश विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. ‘ कुलाबा समाचार ‘ या आंबेडकर विरोधी पत्राने देखील चिरनेर खटला, सायमन कमिशन व गोलमेज परिषद यांतून त्यांनी प्रकट केलेल्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला. ‘ इंडियन डेली मेल ‘, ‘ संडे क्रोनिकल ‘ आणि ‘केसरी’ यांनी देखील आंबेडकरांच्या नियुक्तीचे स्वागत केले.
दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधी यांचा सहभाग अनिश्चित होता. गांधींनी आंबेडकरांच्या मागण्याची भूमिका समजून घेण्यासाठी ऑगस्ट रोजी स्वात भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आंबेडकरांना हे पत्र अनपेक्षित होते, त्या दिवशी ते नुकतेच सांगलीहून परतले होते आणि अंगात खूप ताप भरला होता तरीही त्यांनी ताबडतोब पत्र ” रात्री ८ वाजता मीच येतो असे पत्रात कळविले. सायंकाळी ताप १०६ प्रयन्त गेला तेव्हा त्यांनी पुन्हा निरोप पाठवला व “माझी प्रकृती बारी नाही मला ताप आहे, ताप उतरल्यावर भेटू” असे सांगितले. डॉ आंबेडकर गांधींना मणिभूवन येथे भेटायला १४ ऑगस्ट १९३१ रोजी दुपारी भेटायला गेले. दुपारी २ वाजता हि बैठक सुरु झाली.
या भेटीत गांधी आंबेडकरांना म्हणा कि , दलितांचा प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचा व हिंदू-मुस्लिम प्रश्न पेक्षाही जास्त निकटचा आहे. तरीही दलितांचे नेतृत्व आंबेडकर त्यांना द्यायला तयार नाही या बद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ” आम्ही दलितानावर निवारणावर २० लाख रुपये खर्च केले” असे गोंदी बोलताच डॉ आंबेडकरांनी ” मला माहीतच नाही ” असे मत व्यक्त केले. पुढे आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसचे प्रयत्न हे सणासुदीला नवीन कपडे टाकण्यासारखे आहे आहेत. ” नाशिक सत्याग्रहाच्या विरोधकांचे नेतृत्व नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सभापती करीत आहेत हि गोष्ट लक्षात आणून देत आंबेडकर गांधींना म्हणाले, ” तुम्हीही या सत्याग्रहास विरोध दर्शविला आहे. ” पहिल्या गोलमेज परिषदेतील कार्याबद्दल आंबेडकरांची स्तुती करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत असतानाच डॉ आंबेडकर भावनावश झाले आणि ते संतापाने म्हणाले, ” तुम्ही म्हणता मला मातृभूमी आहे, परंतु मी पुन्हा म्हणतो मला मातृभूमी नाही. कोणताही अस्पृश्य ज्याला थोडा तरी स्वाभिमान आहे., त्याला माणुसकी आहे, ज्याला माणुसकी आहे, तो ज्या देशात त्याला कुत्र्या-मांजरासारखेही जीवन जगायला मिळत नाही किव्हा जनावरासारखीही सहानुभूती ज्याच्या वाट्याला येत नाही त्या देशाला “हा माझा देश आहे” असे म्हणणार नाही.” जे शेतकरी अस्पृश्यांचा छळ करतात त्याच बारडोलीच्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही आकांडतांडव करीत आहेत. आमच्या किंकाळ्यांकरिता तुम्ही आपले कां झाकले आहेत आणि तुमच्या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या वृत्तपत्रांत आमच्या बातम्या छापणारा टाईपच नाही.
“गांधींची काही विक्षिप्त मते ऐकून आंबेडकर अस्वस्थ झाले आणि निघून गेले. गांधींबरोबर होणाऱ्या युद्धाची हि जणू काही नांदी होती. लंडनला जाईपर्यंत डॉ आंबेडकर हे कुणी अस्पृश्यांच्या हितासाठी ब्राम्हण सुधारक आहेत असे गांधींना वाटत असे.
त्याच दिवशी संध्याकाळी कावसजी जहांगीर हॉलमध्ये दलित स्त्रियांनी दिलेल्या निरोप समारंभात तळमळून भाषण करताना त्यांना सांगितले कि, ” आपली गुलामगिरी नष्ट करण्यास तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर आमच्या सर्व कार्याचे श्रेय तुमचेच आहे.” त्यानंतर त्याच ठिकाणी पुरुषाच्या सभेत त्यांनी सांगितले कि : यत्तांचे प्रेम हे त्यांना नेहमीच स्फूर्तिदायक ठरले आहे. सव्वाशे सदस्यांमध्ये आम्ही फक्त दोघे आहोत, तरी तुमच्या हक्कांकरता आम्ही आकाशपाताळ एक करू. सत्ता आणि प्रतिष्ठा संघर्षवाचून प्राप्त होणार नाही.”
दुसऱ्या दिवशी बेलॉर्ड पियरवर संत दलाच्या दोन हजार स्वयंसेवकांनी डॉ आंबेडकरांना सलामी देईन निरोप दिला. “आंबेडकर झिंदाबाद” च्या घोषणा आकाशाला भिडत होत्या. एस.एस. मुलतान बोटीने अनेक सदस्य आंबेडकरांसोबत रवाना झालेत. या वेळी समुद्रात प्रचंड तुफान आलेले होते आणि अनेक प्रवाशांना बोट लागलेली होती, मात्र स्वतः आंबेडकर एन.एम.जोशी व मौलाना शौकत अली हे यातून सुटले होते. या वेळी त्यांच्या मन:प्रवूत्ती इतक्या उल्हसित होत्या कि, आदल्या दिवशीचा त्यांचा ताप पळून गेला होता व ते आपल्या गतजीवनाचे आश्चर्यने सिंहावलोकन करीत होते, : माझ्या जनतेच्या उद्धाराचे एक साधन व निमित्त म्हणून हाताशी धरले आहे, या दृढ जाणिवेने मला प्राप्त होणारे समाधान दुर्मिळ आहे कि, ते फारच थोड्या भाग्यवंतांच्या वाट्याला येत असेल” असे आत्मगत विचार त्यांनी ‘ जनता’ पात्रात लिहिलेल्या पात्रात व्यक्त केले. बोटीवर आंबेडकरांची मुंबईचे पोलीस कमिश्नर, मि.विल्सन यांच्याशी भेट झाली. त्यांनी समता सैनिक दलातील तरुणांच्या शिस्तीची तारीफ केली. तेव्हा आंबेडकरांनी,” तरी तुमचे पोलीस खाते या तरुणांना का अव्हेरते” असे विचारले. व्हीलसं यांनी ” हा वेडेपणा आहे मी स्वतः यातील काही तरुण पोलिसात भरती करण्याचा विचार करतो.” असे आश्वासन दिले. समता सैनिक दलाच्या शिस्तीबद्दल डॉ. मुंजे आणि डॉ. जयकर यांच्या सारख्यानीही तारीफ केली.
सौजन्य :- डॉ बाबासाहेब आंबेडकर (ले.वसंत मून)