आठवणी

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे

ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. मडकेबुवा जाधव, श्री. गायकवाड, श्री. अनंतराव चित्रे श्री. शांताराम पोतनीस, श्री. चांगदेव मोहिते, श्री. बापुसाहेब सहस्त्रबुद्धे. श्री. रामचंद्र मोरे, श्री. केणी, जे. पी. वनमाळी मास्तर यांचेसह सकाळी वेढी गावास जाण्यास मुंबईहून निघाले. वसई स्टेशनवर चांभार समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करून पुष्पहार अर्पण करून त्यांचा जयजयकार केला. दुपारी ११ वाजता वेढी गावानजीकच्या संपाला गावाच्या स्टेशनवर उतरले. सपाला स्टेशनवर परिषदेसाठी मुंबईहून आलेल्या सर्व मंडलीचे ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाने मोठ्या आदराने स्वागत डॉ.आंबेडकरांचे नावाने जयघोष केला. सपाला स्टेशनपासून वेढी हे गाव अदमासे ३/४ मैल दूर आहे. तेथे मुंबईहून परिषदेस आलेल्या मंडळीस नेण्यासाठी मोटार लॉरीची व टांग्यांची १-२ दिवसापूर्वीच आगाऊ तजवीज ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाने करून ठेवून भाड्याचा बयाणाही वाहनवाल्यास आगाऊच देऊन ठेवला होता. ता.२८ मार्च १९३६ रोजी रात्री म्हणजे परिषदेच्या आदले दिवशी सपाला येथील बाहनवाले लोकांची बैठक स्पृश्य लोकांच्या चिथावणीवरून होऊन त्यांनी डॉ.आंबेडकर व त्यांच्या बरोबरच्या माणसांना आपले वाहनातून बसवून नेऊ नये म्हणून ठराव करून ठेविले. सपाला स्टेशनबाहेर डॉ. आंबेडकर व परिषदेकरिता आलेल्या मंडळीसह वाहनात बसण्यास आले. परंतु मोटारवाल्याने आपली मोटार नादुरुस्त असल्याचे सांगितले. दुसरी मोटार तर स्टेशनबाहेर नव्हतीच. तेव्हा सर्व मंडळी टांग्यात बसू लागली, परंतु टांगेवाल्यांनी अस्पृश्य मंडळींना आमच्या टांग्यात बसवून आम्ही नेणार नाही, आजपर्यंत आम्ही कधीही अस्पृश्य माणसांना आमच्या टांग्यात बसविले नाही व तुमचे भाडे न करण्याचा आमचा संप आहे असे स्पष्ट सांगितले. टांगेवाल्यांची ही संपाची भाषा ऐकून सर्व मंडळी पायानेच वेढी गावी जाण्याचा विचार करू लागली. इतक्यात संपात सामील असलेला एक मुसलमान टांगेवाला संपातून फुटून निघाला व आपण भाडे करण्यास तयार आहोत असे त्याने सांगितले. संपातून एक टांगेवालाफुटल्यावर दुसरे ३ भंडारी जातीचे टांगेवालेही संपातून बाहेर पडून भाडे करण्यास तयार झाले. अशारीतीने चार टांग्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व थोडीशी आपण अस्पृश्य म्हणून आज आपणाशी या टांगेवाल्यांनी अशी वागणूक केली हे पाहून हिंदूधर्मातल्या आपल्या स्थितीबद्दल मंडळी वेढीस रवाना झाली. अस्पृश्य मंडळींना खेद वाटल्याखेरीज राहिला नाही. शेवटी १२ वाजता सर्व मंडळी वेढी येथील परिषदेच्या मंडपापाशी मंडपावर ताल वृक्षाच्या आली. परिषदेकरता प्रशस्त मंडप उभारला होता.झावळ्या पसरल्या होत्या. मंडप सर्व बाजूंनी शृंगारला होता. परिषदेच्या मंडपात बाबासाहेब आंबेडकर येताच त्यांचे नावाचा जयघोष झाला. परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातील वसई येथील श्री. विष्णूपंत दांडेकर वकील, बोर्डीचे श्री. मुकुंदराव आनंदराव सावे, वेढी येथील नथोबा त्रिंबकराव म्हात्रे, विरारचे एच. जी. वर्तक, श्री. खंडुभाई शहा, देवमास्तर व वेढी गावची इतर स्पृश्य मंडळी हजर होती व अस्पृश्य समुदाय ३-४ हजारावर हजर होता. परिषदेच्या प्रारंभी ईशस्तवन झाले. त्यानंतर परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. शिवराम गोपाळ जाधव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यांचे भाषण झाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले,

स्वागताध्यक्ष, प्रिय भगिनींनो व बंधुजनहो,

आजच्या या सभेला एक प्रकारचे अपूर्व स्वरूप प्राप्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ज्या दिवसापासून मी सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागलो तेव्हापासून या भागात परिषद झाली नव्हती. १६ वर्षापूर्वी या भागातील टेंभुर्णी आज इतके वर्षांनी येथे एकत्र जमत आहेत, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. ही परिषद घडवून आणण्यासाठी या जिल्ह्याचे पुढारी श्री. शिवराम गोपाळ जाधव यांनी फार परिश्रम घेतले, कष्ट व मेहनत केली याबद्दल मी श्री. जाधव गावी परिषद झाली, त्यानंतर आज परिषद भरत आहे. या जिल्ह्यातील लोक यांचे प्रथम अभिनंदन करून आभार मानतो. सद्गृहस्थहो, पाल्हाळीक भाषण करून तुमचा वेळ मी घेणार नाही, परंतु मी दोन मुद्यांसंबंधी सांगतो. पहिला मुद्दा धर्मांतराचा. . यासंबंधी काही लोक म्हणतात की, तुम्ही धर्मांतर करून काय साधणार आहात? त्याचे उत्तर अनेक त-हेने देता येईल, पण मी साध्या शब्दात त्याचे उत्तर देतो. धर्मांतराचा प्रश्न अत्यंत गहन व तत्त्वज्ञानाचा आहे. त्याची तुमच्या मनाला व बुद्धीला पटेल अशारीतीने चर्चा करणे जरूर आहे.

तुम्ही आज अपंग स्थितीत आहात. तुम्ही अशिक्षित व दरिद्री आहात व कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य नाही, या गोष्टीस पुरावा नको. ज्या खेडेगावात तुम्ही राहता, त्यात तुमची वस्ती व इतर लोकांची वस्ती याची तुलना केली तर तुम्हास समजेल की तुमची स्थिती निकृष्ट आहे. पशुपक्षी व जनावरे निसर्गाने दिलेल्या गोष्टीवर समाधान मानून राहतात.. वासना व महत्त्वाकांक्षा आपणास निसर्गाकडून मिळाले. त्यापेक्षाही काही जास्त मिळावे अशी असते. जावयाचे आहे. तुम्ही आपले पायावर उभे राहू शकाल काय? याचा विचार करा मी जो आज तुमच्या स्थितीचा अभ्यास केला आहे. त्यावरून माझी अशी

खात्री झाली आहे की, तुम्हास कोणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. तुमच्यात फारसे शिक्षित लोक नाहीत. त्याकरिता तुम्हास शिक्षण घेतले पाहिजे व तेही उच्च दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे. एक काळ असा होता की चार पुस्तके शिकलेला स्पृश्य माणूस मामलेदार होत असे, पण आज तो काळ बदलला आहे. आज उच्च शिक्षण घेतल्याखेरीज कोणासही सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत. तुम्हास आज अन्न खाण्यास नाही, ते तुम्ही लोक आपल्या मुलांना बी.ए., एम.ए. कसे करू शकाल? तुमच्यामध्ये असा कोणीही माणूस नाही की तो आपल्या ऐपतीवर मुलास सुशिक्षित करील. याकरिता जो समाज तुम्हास शिक्षणाचे बाबतीत तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करिता जर तुमचा स्वाभिमान सांभाळून मदत देईल तर अशा समाजाशी तुम्ही सहकार्य करून स्पृश्य हिंदूंच्या स्पर्धेत अग्रेसरत्व मिळविले पाहिजे. आज आपले पुष्कळ लोक काबाडकष्ट करून पोट भरतात. त्यांनी जर काबाडकष्ट केले, रोजगार धंदा केला तरच त्यांना पोटभर अन्न व अंगभर वस्त्र कसेतरी मिळू शकते. आपणास आज जो रोजगार धंदा मिळतो तो स्पृश्य लोकांकडून मोठ्या मिनतवारीने मिळतो. तुम्हास स्वतंत्र धंदा नाही, स्वतंत्र शेती नाही, स्वतंत्र व्यापार नाही व त्याची साधनेही नाहीत व स्वतंत्र साधने उत्पन्न करण्याची तुम्हास ऐपत नाही व ऐपत असली तर संधी नाही. सरकारने कायदा करून आपणास सरकारच्या ताब्यातील सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क दिला आहे पण आपणास असा अनुभव आहे की, स्पृश्य लोक त्या पाणवठ्यावर आपणास मुळीच पाणी भरू देत नाहीत. जर आपण त्या पाणवठ्यावर पाणी भरले तर स्पृश्य लोक तुमच्यावर बहिष्कार टाकतात. त्यावेळी तुमचे अत्यंत हाल होतात. त्या हालाच्या, छळणुकीच्या व संकटाच्या वेळी, त्याच गावचे मुसलमानही तुम्हास बहिष्कारातून संकटातून  छळणुकीतून तुमची सोडवणूक करण्यास मदतीला येत नाहीत. त्या वेळी धीराने आपण संकटे सोशीत राहतो. त्या संकट-ग्रस्त ग्रस्तप्रसंगी आपली स्थिती असहाय होते, अशावेळी आपण ज्या स्थितीत असतो त्यावेळी आपणास काही करता येत नाही त्याकरिता आपणास आजच्या स्थितीत दुसऱ्याचे सहाय्य घेणे जरूर आहे.
आज ज्या त्या हिंदू समाजातील जाती आपस्वार्थी बनून आपआपल्या जातीस मदत करीत आहेत; पण ह्या हिंदू स्पृश्य जाती आपल्या अस्पृश्य समाजाला मदत करीत नाहीत. कारण त्या स्पृश्य हिंदू जातीचे लोकांचे व आपले लागेबांधे नाहीत. त्याकरिता आपणास जे मदत करतील व आपल्या असहाय स्थितीत संरक्षण करतील, त्यांचे बरोबर क्र्णानुबंध जोडून घेतला पाहिजे. आज आपण हिंदू समाजाचे सर्व देव धर्म पाळीत आहोत, तरीही पण आपली हिंदुधर्मीय स्पृश्यांकडून उपेक्षा झालेली आहे. हिंदुधर्मीय आपणाकरिता काहीही करू शकत नाहीत. नुकताच महात्मा गांधींनी हरिजनात लेख लिहिला आहे. त्यांच्याकडे अस्पृश्य वर्गाच्या काही विद्यार्थ्यांनी आपणास विद्यार्जनाच्या बाबतीतल्या अडचणीतून काढण्यासाठी अर्ज केले होते व स्कॉलरशिपांची मागणी केलेली होती. त्या अर्जास महात्माजींनी उत्तर दिले आहे की, जर सवलती मिळविण्यासाठीच तुम्हास हिंदू धर्मात राहावयाचे असेल, तर तुम्ही हिंदू धर्म सोडून गेला तरी चालेल. महात्माजीसारख्यांची ही भावना झाली. मग इतर सामान्य लोकांची कशा प्रकारची असू शकेल ?यावरून व अनेक गोष्टीवरून हिंदू धर्माच्या लोकांकडे आशा ठेवून राहणे चूक होईल. तुम्हास तुमची उन्नती व प्रगती करून घेणे असेल तर तुम्हास सहृदय व सामर्थ्यवान, शीलसंपन्न, निस्वार्थी अशा समाजाशी लागाबांधा जोडला पाहिजे आणि असा लागाबांधा दुसरे समाजाशी जोडून घेणे याचाच अर्थ धर्मांतर.

मुसलमान, ख्रिस्ती व शीख हे आपणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. तर त्यांच्याउलट हिंदुधर्मीयांची प्रवृत्ती कशी आहे ते पहा. -महात्मा गांधींनी स्वराज्य संपादनासाठी ज्यावेळी हिंदू समाजाकडेमदतीची याचना केली त्यादेळी त्यांना कोट सवा कोट, रुपये मिळू शकले, पण त्यांनी ज्यावेळी अस्पृश्यांच्यासाठी हिंदू समाजाकडे पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांना अखिल हिंदुस्थानात, मोठ्या मिनतवारीने आठ लाख रुपये मिळाले. त्यापैकी चार लाख रुपये दोन वर्षांत खर्चून टाकले गेले व राहिलेले चार लाखही या वर्षा सहा महिन्यात कसे तरी खर्च होणार असे समजते. यावरून हिंदू समाज स्वराज्याकरिता किती स्वार्थत्याग करण्यास तयार आहे व अस्पृश्योद्धारासाठी किती स्वार्थत्याग करण्यास तयार आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

मुसलमानांच्या एका सभेने एक कोटी रुपे जमवावेत व आपल्याकरिता खर्च करावेत असा विचार केला. तर शीख समाजाने लाखो रुपये जम उज्नतीसाठी खर्च करण्याचा निर्धार केलेला आहे. याच्याउलट हिंदू समाज स्वस्थ डोळे झाळून बसला आहे. डोळ्यावर बळेच कातडे ओढून बसलेल्या या हिंदू समाजाकडून तुम्हास मदत तर नाहीच पण तो समाज तुमच्या प्रगतीच्या मागात अडयळे उत्पद्र करीत आहे. त्यामुळे तुमचा त्यांचेकडून उद्धार होणार चाही. आजच्या प्रगतीच्या काळात आपण आपला मार्म हिंदू र्याचे लोकांपासून अलग स्वतंत्रपणे चोखाळला पाहिजे. स्वाभिमानाला व सन्मानाला धक्का न देता. जे आपल्या प्रगतीला समतेने मदत करतील अशा समाजाशी आपण सहकार्य केले पाहिजे.पूर्वजांचा धर्म उराशी कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे ? खोट्या अभिमानाचा आपण त्याग केला पाहिजे. हिंदू धर्मात चातुर्वण्यांची घातक प्रथा आहे व ती मोडण्याची चिन्हेही दिसत नाहीत. या चाुर्र्ययांने व वर्णाभमचर्माने आपले अत्यंत नुकसान केलेले आहे. वर्णाश्रमधर्म व्यवस्थेमुळे, ब्रह्मणाशियाय इतर कोणीही विद्या संपादन करू नये, क्षत्रियांशिवाय कोणी शस्त्र घारण करू नये. अशा वर्णव्यवस्थेमुळे आपले. पूर्वजास अज्ञानी व निर्बल करण्यात आले  वर्णाश्रमधर्माने आपणास ज्ञान, सत्ता. शस्त्र व संपत्ती याचा उपयोग घेऊ दिलेला नाही. या वर्णाशरमधर्माने आपल्या पूर्वजांची प्रतिकारशक्ती नाहीशी केली, त्याचे प्रगतीपर मार्गावर पाऊलथ पडू दिले नाही. आज आपली तशी स्थिती नाही. हल्ली सर्वास शिक्षणाचा मार्ग खुला आहे. शस्त्रधारणाची वाट नोकळी आहे. प्रगतीचा मार्ग खुला आहे. अशा स्थितीत, पूर्वजांच्या घर्माला आजही तुन्ही कवटाळून बसलात. तर तुमधी कधीच उत्नती होणार नाही. तुम्ही शक्ती संपादन करून व खोट्या रूढीची बंधने तोडून, धडाडीने स्थोज़तीचा मार्ग चोखाळा, हे मी तुम्हास निकून सांगत आहे. याचा खोलबुद्धीने व शांत- चित्ताने विचार करा व प्रगतीच्या मार्गावर पाऊले टाळून उज्ज्वलतेचा रस्ता घरा. आता राजकारणासंबंधी दुसरा प्रश्‍न आहे. एका वर्षानंतर मुंबई इलाख्यात व हिंदुस्थानात नवी राज्यघटना निर्माण होणार आहे. त्या राज्यघटनेसंकंधी तुमचे कर्तव्य काय आहे. हे दाखवून देण्याची माझी इच्छा आहे. आजपर्यंत तुमची अशी दृष्टी असे की, आपणास ज्या अडचणी येतील त्या नाहीशा होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याकडे अर्ज करावयाचे. या अर्जापासून तुमची संकटे दूर होतील, अशी तुमची कल्पनाही होती. कलेक्टर हा राजा आहे. अशी तुमची भावना. कलेक्टर हा एका दृष्टीने राजा होता. कारण आजकाल नोकराहीची सत्ता आहे. पण ही परिस्थिती पुढल्या वर्षापासून पालटली जाणार आहे. एक वर्षानंतर राजकारणात. नोकरशाहीस स्वतंत्र स्थान व सत्ता राहणार नाही. नवीन राज्यघटने प्रमाणे सर्व अधिकार कायदेमंडळाकडे जातील व कायदेमंडळाच्या हुकुमतीखाली कलेक्टरांना व मामलेदारांना मान वाकवून वागावे लागेल. म्हणजे कायदेमंडळ हे पुढे महत्वाचे स्थान होणार. त्या कायदेमंडळात आवल्याला महत्व प्राप्त झाले कारणाचे भवितव्य कायदेमंडळावर अवलंबून याकरिता कावदेमंडळावर चांगली माणसे गेली पाहिजेत. शेठ, सावकार. देलेवाले कायदेमंडळावर डोळे ठेवून आहेत. या लोकांकडून गरीय जनतेचे मुळीच कल्याण होणार नाही. याकरिता, गोरगरिबांमध्ये मिळून मिसळून काम करणऱ्या, गोरगरिवांच्या आकांकषांची जाणीव असलेल्या निस्वार्थी, निभींड. लायक व मतदारांशी इमानीपणानी वागणाऱ्या गोरगरियांच्या प्रतिनिधींची आपणास निवड केली पाहिजे. आपल्या खराखुन्या हितचिंतकांना जर आपण कायदेमंडळावर  निवडून दिले. तरच आपले पाऊल पुढे पडेल व आपले थन होईल. कायदेमंडळावर निवडून देण्यासाठी आपणास मताचा अधिकार आहे. हा. अधिकार फार महत्त्वाचा वे मोठा आहे. तेव्हा आपली मतदानाची बहुमोल शक्‍ती भलत्याच ठिकाणी याया जाता उपयोगी नाही. आपले खरे कळकळीचे व इमानी हितचितक कोण आहेत हे मी आपणास वेळेवर सांगेन. त्यांनाच तुम्ही मतदान करा. सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात. पण मते ही विकण्याची उस्वू नाही. ती आपले संरक्षणाची साधनशकक्‍्ती आहे. मते विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आतत्मघातही आहे. मते विळून नालायकांची खोगीरमरती ‘कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिनित नुकसान होऊन राष्ट्र अबोगतीस जाते. स्वत: नालायक व अपात्र असून पैशाचे जोरावर कायदेमंडळावर जाऊ इच्छिणारे ‘काही लोक तुम्हास द्रव्याचे आमिष दाखवतौल. दारिद्चामुळे तुम्हास मते विकावी को काय असा मोह उत्पन्न होईल. अशा कोणत्याही मोहास तुन्ही विलळ्कूल बळी पडू नका. मोडास बळी पडलात तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या ‘पायाबर धोंडा पाडून घ्याल ही थोल्याची सूचना मी आज सवांना देत आहे. मते. ‘बिकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तर तो द्रव्याच्या बळावर ओपली लायकी प्रस्थापित करण्याचा अट्टाहास करतो. अशा नालायक माणसाकडून समाजहिताची अगर राष्ट्रहिताची कार्ये होत नाहीत. पैसेवाला जर कायदेमंडळात सभासद म्हणून गेला, तर तो द्रव्यवल्या लोकांथेच हितसंरक्षण करील व तो आपल्यासारख्या गोरगरिबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका 1 तसे तुम्ही करणार नाही अशी माझी खात्री आहे. पैसेवाल्यांच्या कसल्याही प्रकारच्या आमिषाला ब मुलमुलाबणीला, ‘गोडीगुलावीच्या मायावी माषणाला आणि पैशाला तुम्ही वळी पडू नका व आपली दिशाभूल करून घेऊ नका. आपणाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा जर आपण चांगल्या उपयोग केला तर आपण चांगलीथ माणसे कायदेमंडळावर निवडून आणू व त्यावेक्षा जास्त आपली उत्रती आपण करू शकू, आपणास कोणाची निवड ‘कायदेमंडळावर करावयाची त्याबद्दल मी वेळेवर सांगेन. शेवटी ही परिषद यशस्वी करण्यासाठी तुम्ही लांबलांबून येथे येण्याचे जे कष्ट घेतलेत व माझ्यावर जो लोभ दाखविलात त्याबद्दल मी तुमचे व या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. शिवराम गोपाळ जाधव यांचे आभार मानून आपले भाषण पुरे करतो.

संदर्भ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (खं. १८ भा. १)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 8   +   7   =