छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
• शासन निर्णय :-
1) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.11 जून 2003
2) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.8 जुलै 2003
3) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.21 जुलै 2003
• उद्दिष्ट:
इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात.
• पुरस्काराचे स्वरूप
1 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास अनु.जाती, | रु. 2.50 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
2 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डमधून प्रथम आलेल्या अनु.जाती ,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास | रु.1.00 लाख रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
3 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादी मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास | रु.50 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
4 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास | रु.25 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
5 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास | रु.10 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
6 | सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयता 10 व 12 मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास | रु.5 हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००३
राजर्षी शाहूमहाराज गुणवत्ता पुरस्कार योजना माहिती दर्शविणारा तक्ता