बौद्धमय भारत

भिक्खूची कर्तव्ये बाबत बाबासाहेबांनी काय सांगितले ?

1) यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची (conversion) वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, *देशातील सर्वात श्रेष्ठ कुळांतील (highest families) आणि इतर कुळातील उपासक बुद्धांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले.*

2) पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिश: मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. *म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला *”संघ” या नावाने धार्मिक संप्रदायाचे (religious order) रूप देणे त्यांना आवश्यक वाटले.*

3) तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना *शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले.* (framed rules of discipline called vinaya, and made them binding upon the members of the Sangh.)

4) नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थांतून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परिक्षक मंडळासमोर आपली योग्यता सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल, असे ठरविले.

5) धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून बुद्धांनी त्यांना भिक्खू बनविले व भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रसारित करण्यासाठी *धम्मदूत* (Missionaries) म्हणून पाठविले.

6) धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, *”भिक्खूहो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनांपासून मुक्त झालो आहे. भिक्खूहो, तुम्हीही अशा बंधनांपासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा.”*

7) *”कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती कल्याणकारी; त्याप्रमाणेच तत्त्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण अशा श्रेष्ठ जीवनाची घोषणा करा.”*

8). “सर्व देशांत जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या सर्व जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या.”

9) “ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रम्हर्षी (great Rishis, royal Rishis, Brahman Rishis too) वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे प्रभावित करा.”

10) “एकटेच जा. करुणामय अंतःकरणाने जा. लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या.”

11) भगवंतांनी त्यांना असेही सांगितले,

12) *”धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे.”*

13) “शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे *मोह व तीव्र आकांक्षा यांमुळे* नुकसान होते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.” (“The fields are damaged by weeds, mankind is damaged by passion; therefore a gift of Dhamma brings great reward.)

14) “शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे *द्वेषामुळे* (hatred) नुकसान होते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.”

15) “शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे *गर्वाने* (vanity) नुकसान होते. म्हणू न धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.”

16) “शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे *तृष्णेने* (lust) नुकसान होते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठ आहे.”

17) अशा रीतीने *धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आदेश* घेऊन *साठ (60) भिक्खू* धम्मप्रचारार्थ सर्व देशांत गेले. (Then the sixty Bhikkhus, receiving orders to carry on the mission to propagate the Dhamma, went through every land.)

18) धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना पुढे अधिक शिक्षण दिले.

– भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म : डॉ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ : पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग तिसरा- भिक्खूची कर्तव्ये
Part III- The Duties of The Bhikkhu
*************************
1. भिक्खूची दीक्षा देण्यासंबंधी कर्तव्ये
The Bhikkhu’s Duty to Convert
*************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *