अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-४)

बाबरी मशिद
याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी
जसा बाबरी मशिद प्रश्‍न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्‍न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्‍नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या प्रश्‍नावरती कदाचित राहणार नाहीत, म्हणून त्यांनी घटनेलाच विरोध केला; आणि घटनाच बदलली पाहीजे अशी भूमिका घेतत्ठी घटना वटलामध्ये त्यांचे टोन महत्वाचे मुद्दे होते ते म्हणजे संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे आणि दुसरा राखीव जागा काढून टाकणे त्यांनी जो धोरणात्मक बदल केला तो राखीव जागा विरोधाऐवजी घटनाविरोधी भूमिका घेतली ही भूमिका घेण्यामागचा त्यांचा हेतू की सवर्ण हिंदु आणि ओबीसी हिंदू यांच्यात पडत चाललेली दरी मिटवायची असेल तर आपण राखीव जागांविरोधी आहोत असे दर्शविता कामा नये.
या सर्व धार्मिक संघटनांनी भाजप आणि शिवसेनेला पुढे केले खरे तर त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती उच्चवर्णिय मंडळीनी यापुर्वी राखीव जागेच्या विरूद्ध गदारोळ उभा केला होता. त्यांच्यातला जो धोरणात्मक बदल
त्यांनी केला त्याचे कारण हे की राखीव जागाविरोधी त्यांनी भूमिका घेतली ओबीसी आपल्याकडून निघून जातो आणि घटनाविरोधी भूमिका आपण घेतली तर आंबेडकरी समूह जोरदार रिअक्शन देईल. त्यांच्या रिअक्शनचा आपल्याला
फायदा घेता येईल त्यांना आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्ते हे रिअक्शन देण्यात फार तत्पर आणि उत्साही आहेत याची जाणीव होती आंबेडकरवाद्यांनी घटना बदल्याची रिअक्शन दिली की सवर्ण हिंदू आणि ओ. बी. सी. यांना एकत्र आणता येते, हे त्यांचे गणित होते. आंबेडकरी चळवळ एकजातीय स्वरूपाची असल्यामुळे ‘आपली घटना बदलत आहेत’, ह्या आंबेडकरवाद्यांच्या विधानाचा अर्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोयीस्करपणे ‘ही त्यांची घटना’ असा केला आणि म्हणून ते चवताळलेत असा प्रचार केला; आणि लोकांची दिशाभूल केली. आपल्याला ‘आपल्याला आपली घटना बनवायची आहे ‘ असा प्रचार सुरू केला व दुसरी घटना बनविण्यासाठी वातावरण तयार करायत्ठा सुरूवात केली. आंबेडकरी मंडळी आपण काय भाषणे देतो याचा सारासार विचार कधीच करत नाहीत. त्यामुळे अनेकदा आपली भाषणेच विरोधकांच्या हातात आयते कोलीत होतात. याला भावडेपण म्हणावे, अज्ञान म्हणावे;
की हेतुपरस्पर म्हणावे हे मला तरी समजत नाही आंबेडकरी चळवळ ही अशा प्रकारे प्रतिक्रियावादी पद्धतीनेच पुढे चालविली गेली , तर जास्त काळ टिकणार नाही परंतु राखीव जागांचा मुद्दा हा घटनेचे अविभाज्य अंग आहे किंवा तो सविंधानाचा ‘मुलभूत पाया आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *