लेणी

काळाच्या ओघात दुर्लक्षित ठाणाळे लेणी

काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचे..अष्टविनायकातील पाली गावाच्या जवळच रायगड-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली हि लनी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे . या लेण्यांचा काळ इ.स. पूर्व दुसरे शतक . त्याकाळी कोकणातील चौल हे व्यापाराचे बंदर होते. हा माल अलिबाग वरून पाली-सुधागड मार्गे नाडसूर-ठाणाळे इथवर येत असे..येथून तो देशावर पोहोचवला जात असे..या प्राचीन मार्गावरील डोंगर कापारीत ठाणाळे लेणी कोरलेली आहेत.त्यामुळे त्यांना पूर्वी पुष्कळ महत्व होते . बौद्ध भिक्खुंचे तांडे वर्षाकाळात ठाणाळे लेण्यातील विहारात वास करीत.सन १८९० मध्ये लेफ्ट.रेव्ह.जे.अ.एबर यांनी हि लेणी शोधून काढली पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गे सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्यात हि लेणी कोरलेली आहेत. पाली गावातून स्थानिक एस.टी. किंवा रिक्षाचा आसरा घ्यावा लागतो. ठाणले गावातून मात्र पुढे पायवाटेने सुमारे दीड तासांची पायपीट करून लेण्यांपर्यंत पोहोचता येते. रानात चकव्या वाट पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम. पायथ्यापासून १००० फुटांवर असलेली ही लेणी पश्चिमाभिमुख आहेत. तेवीस बौद्ध लेण्यांनी युक्त अश्या या लेणीसामुहात एक चैत्यगृह ,एक स्मारक स्तूप समूह व एकवीस निवासी गुहा आहेत. दक्षिणोत्तर दिशेत एका माळेत कोरलेल्या बहुतांशी लेण्यांमध्ये बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी दगडी ओटे खोदलेले आहेत..ठाणाळे लेणी समूहातील एका विहारात प्राकृत – ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले पाण्याचे टाक आहे. ठाणाळे लेण्यांमधील सर्वात आकर्षक व प्रशस्त असे सात क्रमांकाचे दालन साधारण मध्यावर आहे. सभागृहाच्या तीनही आंतरभिन्तींना लागून ८ भिक्षुगृहे कोरलेली आहेत .एका भिंतीवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. या शिलालेखात शिवगण पुत्र गोदत्त याने या लेण्यांसाठी दान केले असा मजकूर आहे. या सभागृहाच्या भिंतींवर विविध प्राणी व मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत. सोंडेत कमळ धारण केलेला हत्ती, पाच फाण्यांचा नाग, एक सिंहीण आणि तिचा छावा इत्यादी शिल्पकृती लक्षणीय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 9   +   10   =