बौद्धमय भारत

“त्याचे स्वागत करायचे नाही!” ठरवूनही पाच परिव्राजक बुद्धांसमोर का नतमस्तक झाले? जाणून घ्या ‘सारनाथ’चा तो ऐतिहासिक प्रसंग!

आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?” (“to whom shall i first teach the doctrine?”) त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. “त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा […]

आंबेडकरी चळवळीचा इतिहास

महाराष्ट्रात आंबेडकर जयंतीची सुरुवात कुणी आणि कशी केली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा विचार केला की आपल्या डोळ्यांसमोर मुंबई, नागपूर किंवा महू यांसारख्या मोठ्या शहरांचे चित्र उभे राहते. परंतु, ऐतिहासिक व सामाजिक परिवर्तनाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला वाढदिवस (जयंती) साजरा करण्यात आला होता, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मुख्य शिल्पकार होते […]

आंबेडकरी चळवळीचा इतिहास

दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा पुतळा उभा राहताना शिल्पकार का ढसाढसा रडले होते?

भारताच्या सामाजिक व धार्मिक इतिहासात नागपूरची दीक्षाभूमी ही परिवर्तनाची आणि समतेची प्रेरणाभूमी मानली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह याच पवित्र भूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन एका नव्या युगाची पायाभरणी केली. संविधानाचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते असणाऱ्या महापुरुषाच्या या ऐतिहासिक स्मृतीसाठीची जागा शासनाकडून सहज उपलब्ध होणे अपेक्षित होते; परंतु या भूमीसाठीही आंबेडकरी […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा पहिल्यांदाच बाबासाहेबांची जयंती साजरी होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिला जन्मोत्सव म्हटल्यावर आपल्या मनात मुंबई, नागपूर, महू आदी शहरांचा विचार आला असेल. पण तसे मुळीच नाही. अनेक वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक चळवळींची मुहुर्तमेठ रोवणाऱ्या पुण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे 24 ऑगस्ट 1898 […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

दीक्षाभूमीवरील मुर्ती चा संघर्षमय इतिहास माहित आहे का ?

कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून दीक्षाभूमीचे स्मारकही सुटले नाही. खरतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. संविधानाचे रचनाकार व आधुनिक भारताच्या निर्मात्या या युगनायकाच्या ऐतिहासिक परिवर्तनाची जागा स्मारकासाठी सहज उपलब्ध करणे सरकारतर्फे अपेक्षित होते. मात्र या जागेसाठीही संघर्ष करावा […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आणि तो भारतात ला पहिलाच बौद्ध पद्धतीचा विवाह ठरला !

जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर हे दोघेही नोव्हेंबर १९५३ ला दिल्ली हुन मुंबई ला फ्रंटियर मेल या रेल्वे ने प्रवास करत होते मोटारिने बंगल्याहुन स्टेशन ला आल्यावर गाडीतून उतरताना साहेबांच्या हाताची बोट गाडीच्या दारात चेपली आम्ही तसेच गाडीत बसलो थंडीचे दिवस होते आणि कड्याक्याची थंडीही वाजत होती थंडी असल्याने त्यांच्या बोटात तीव्र […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड

बाबासाहेब अर्थात डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सुभेदार रामजींना फार त्रास घ्यावा लागला मुलाला शोभेल अशी अनुरुप वधू पाहिजे. जो कोणी मुलीचा पत्ता सांगत असे तिकडे न चुकता सुभेदार रामजी जात होते. त्यासाठी त्यांचा बराच वेळ खर्च करावा लागला नंतर सुभेदार रामजींनी एक मुलगी भिमरावांसाठी पसंत केली चाळीतील लोकांच्या रीतीरिवाजा प्रमाणे साखरपुडाही […]

बातमी

बौद्ध विहार दिव्यांनी उजळून निघणार, विकासावर ३५६.९६ लाख खर्च होणार

बुद्धांचे महापरिनिर्वाणस्थान असलेल्या कुशीनगर येथे असलेल्या विविध देशांच्या बौद्ध मठांमध्ये पर्यटनावर आधारित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. प्रकाशयोजना, सुशोभिकरण, स्वच्छतागृहांसह अनेक सामुदायिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून नदीकाठच्या जागेवरही विकासकामे केली जाणार आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून म्यानमार बौद्ध विहारमधील चंता जी जेडी (समृद्धी चैत्य) गतिमान मुखपृष्ठाच्या प्रकाशाने […]

बातमी

बाबासाहेबांचा फोटो लावल्याबद्दल दलित तरुणाची गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील रामपूर येथे डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा फोटो लावण्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला होता. या गोळीबारात एका दलित तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृताच्या कुटुंबियांनी भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेखाली मृतदेह ठेवून निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या गोळीबारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आंदोलन […]