लेखकांचे जग

दीप दान ही परंपरा केवळ बुद्धिस्टांची आहे

बुद्धिस्ट परंपरेमध्ये दीपदान उत्सवाचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. सखोल अध्ययन केल्यास आपणास ते दिसून येईल. आपणासमोर मी केवळ एक पुरावा या ठिकाणी सादर करतो. बाकी आपण स्वतः अध्ययन करावे आणि ते पुरावे शोधून काढावे हे मी आपल्यावर सोपवतो.
इ – तसिंग हा चिनी बौद्ध यात्री याने आपल्या जीवनाची 19 वर्ष खर्च केली ही साधारण बाब नाही. त्याने चीन वरून भारतात येण्यासाठी चा प्रवास इसवी सन671ला सुरू केला. इसवी सन 675 ते 685 या 10 वर्षात त्याने नालंदा विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. या प्रदीर्घ 19 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने जे भारतात पाहिले ते त्याने पुस्तकाच्या स्वरूपात लिहून ठेवले. आज त्यांनी लिहून ठेवलेल्या त्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ सहकारी संतराम बी.ए. यांनी आपणास उपलब्ध करून दिलेला आहे. बी.ए.संतराम हे विश्वसनीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांनी केलेला अनुवाद हा प्रमाणित आहे.
या प्रवाशाने त्याच्या पुस्तकांमध्ये दीपदान उत्सवाचा पुरावा अशाप्रकारे दिलेला आहे,”चौदहवें दिन की रात को (पंद्रहवां एकांत वास का अंतिम दिन होता है) संघ एक कथक को बुलाकर एक उच्च आसन पर बैठाता और उसे बुद्ध के सूत्त कहलाता है. इस समय सामान्य उपासकजन और भिक्खुगन मेघों अथवा कुहरे के सदृश्य इकठ्ठे हो जाते हैं. वे लगातार दीपक जलाते और धुप तथा पुष्प चढाते हैं. अगले दिन सवेरे वे सब ग्रामो और नगरों के गिर्द जाते हैं और सच्चे मनसे सारे चैत्यों का पूजन वंदन करते है.”
बुद्धिस्ट परंपरेमधील दीपदान महोत्सवाचे पुरावे आपणास आणखी हवे असतील तर आपण Rational World या युट्युब चॅनेल वरील SJL व्हिडिओ क्रमांक 506 जरूर पहा. आपलीच दीप दानाची परंपरा असून हे भ्रमवादी लोक आमची परंपरा आहे असे सांगत आहे. आम्ही ते मान्य करतो आहे यापेक्षा दुसरी मूर्खपणाची बाब कोणती असू शकते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या पद्धतीने हे भ्रमवादी लोक दीपदान उत्सव किंवा दिवाळी साजरी करत आहे त्या पद्धतीने आपण साजरी करू नये कारण ही पद्धत ब्राह्मणवादी लोकांची आहे. आपण कोणत्या पद्धतीने दीपदान उत्सव साजरा करावा यासाठी आपल्याला नियोजन करावे लागेल.
इतका सूर्यप्रकाशा सारखा स्पष्ट आणि सत्य दीप दान उत्सवाचा पुरावा जर बुद्ध परंपरेमध्ये मिळत आहे तर मग दीप दान महोत्सव हा बुद्धिस्टांचाच होय हे सिद्ध होते.
प्रा. गंगाधर नाखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 10   +   10   =