

सम्राट अशोक यांच्या मुद्रेवर एक धम्मदंड आपणास दिसून येईल. बौद्ध भिक्खु आपल्या हातामध्ये वज्र किंवा दंड्याच्या स्वरूपामध्ये आपल्या जवळ ठेवत होते.
धम्मदंड हे समुद्रमंथनाचे प्रतीक आहे. त्यामध्ये धम्म दंडाला मेरू पर्वत किंवा मंदार पर्वत च्या स्वरूपात देव आणि असुर नागाच्या मदतीने दुधाच्या समुद्रामध्ये फिरवीत आहे आणि त्यामधून अमृत इलाज करणारी देवता धन्वंतरी आणि इतर रत्न निर्माण होते.
बौद्ध लोक विश्वस्तंभाच्या वर ध्यानाच्या माध्यमाने चढून स्वर्ग (ध्यानाची सुखमय अवस्था) मध्ये पोहोचत होते आणि बुद्धाचे दर्शन करून हे सर्व रत्न प्राप्त करीत होते.
म्हणून धम्मराजा सोबत सात रत्न दाखविले जाते. त्याला सप्तरत्न म्हटले जाते. महावस्तू आणि दिव्यदान मध्ये चक्रवती च्या सोबत उष्णीशा (मुकुट), छत्र, वज्र, चाबूक आणि पादुका दिसून येतात आणि हे क्षत्रियाचे प्रतीक आहे.
चक्रवती सम्राट चे सप्तरत्न-धम्मचक्र, र
थ, मूल्यवान रत्न, पत्नी, खजिना, घोडे,आणि हत्ती हे होते.
अमरावती च्या स्तूपामध्ये चक्रवती सम्राट अशोक या रत्नांसोबत दाखविलेले आहे. ब्राह्मणांनी याच बौद्ध संकल्पनेला चोरून पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा लिहिली आणि त्यामध्ये अलग अलग रत्न समुद्रामधून निघत आहे असे दाखविलेले आहे.
या रत्नांना घेऊन ब्राह्मण देवता पळून जाते आणि असुरांच्या वाट्याला अराजकतेचे विष ठेवून देतात. त्या विषाला शिव प्राशन करून असूरांना वाचविते. या सर्व कथा ब्राह्मणांनी गुप्तकाळानंतर लिहिलेल्या आहेत. सर्व गुप्त राजे हे बुद्धिस्ट होते.
हलाहल विष अराजक संसार चक्राचे प्रतीक आहे. हलाहल अराजकता होय. या अराजत्तेमध्ये सर्वत्र अस्थिरता, अस्वस्थता आणि सर्वत्र सैरावैरा धावपळ राहते. ब्राह्मणांनी शिवालाच मार घोषित करून त्याच्याकडून असुरांच्या प्रदेशांमध्ये अनैतिकता, अस्थिरता आणि त्यांच्या माध्यमातून बुद्धिस्टांचे असुर म्हणून पतन केले त्यांचा अंत केला. हा समुद्रमंथनाचा वास्तविक अर्थ आहे.
दुसऱ्या बाजूला ब्राह्मणांनी धम्मचक्र मध्ये प्रवेश करून स्वतःसाठी धम्मराजाचे अमृत प्राप्त केले, साहित्याचा अर्थ आहे.
ही संकल्पना मी एवढ्यासाठी सांगितलेली आहे ही समुद्रमंथनाची संकल्पना ब्राह्मणवाद्यांनी बुद्धिस्टां पासून उचललेली संकल्पना आहे. बऱ्याच लोकांना यामध्ये काहीही समजले नसण्याची शक्यता आहे. (संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्म से संबंध, डॉ.विलास खरात, डॉ.प्रताप चाटसे, क्रमांक 113)
मराठी अनुवादक
प्रा. गंगाधर नाखले