

ब्रिटिश अधिकारी मेजर जनरल कनिंघम यांनी मथुरेची खोदाई जेव्हा केली, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी उत्खननामध्ये कमीत कमी दोन बुद्ध मठ , शिलालेख आणि अनेक मूर्ती सापडल्या होत्या. यावरून तर सिद्ध होतेच की मथुरा ही कृष्णाची नसून बुद्धाची धरती होय.
ब्रिटिश अधिकाऱ्याच्या या संशोधनाला चौथ्या(सन 399 414ते ):शतकामध्ये चिनी प्रवासी फाह्यांन भारतात आला होता. त्याने नालंदा विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेतले होते. तो जेव्हा मथुरेला आला तेव्हा त्याला जे दिसले ते खाली देत आहे.
फाह्यान जेव्हा पंजाब वरून निघाला तेव्हा तो तिथून दक्षिण पूर्व दिशेला 80 योजना (एक योजन म्हणजे 8 ते 12 किलोमीटर) चालत आला. तेव्हा त्याला रस्त्यामध्ये सतत खूप सारे बुद्ध विहार पाहायला मिळाले. त्या बुद्ध विहारांमध्ये राहणाऱ्या श्रमणांची संख्या लाखात होती. सर्व स्थळांचा प्रवास करत करत ते एका जनपदा मध्ये पोहोचले.
त्या जनपदाचे नाव मताऊला (मथुरा) होते. (म्हणजे त्यावेळी मथुरा हे नाव नव्हते,हे लक्षात घ्या आज आपण त्याला मथुरा म्हणतो.). पुना (यमुना नदी) च्या काठा काठाने ते गेले. नदीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 20000 बुद्ध विहार त्याला दिसले. ज्यामध्ये 3000 पेक्षा जास्त बौद्ध भिक्खू तिथे राहत होते.
बौद्ध धम्माचा जबरदस्त प्रभाव तेथे असल्याचे त्याला जाणवले. मरूभूमी पासून पश्चिम भारता चे सर्व जनपदा मधील अधिपती म्हणजेच राजा बौद्ध धर्माचे अनुयायी होते. भिकक्खु संघाला ते भिक्षा अथवा दान देताना आपल्या डोक्यावरील मुकुट काढून ठेवत असत. राजे स्वतः आपल्या कुटुंबासह आणि अमात्यांसहित स्वतःच्या हाताने त्यांना भोजन वाढत असत.
जेवण वाढून झाल्यानंतर भिक्खु संघाच्या नायका समोर ते आसन टाकून बसत असे. भिक्खु संघासमोर तो राजा जरी असला तरी खाटेवर बसण्याचे धाडस करीत नसे. तथागत बुद्धाच्या वेळी जी प्रथा राजांमध्ये भिक्षा देण्याची होती तीच प्रथा आजपर्यंत ही चालू असल्याचे त्याला तिथे दिसून आले.
प्रजा खूप साधन संपन्न आणि सुखी असल्याचे त्याला दिसून आले. कोणताही व्यवहार लिखित होत नसे आणि पंच- पंचायतचे अस्तित्व नव्हते. लोक राजाची जमीन वाहत असे जनता त्या उत्पन्नामधील काही हिस्सा कराच्या रूपाने राजाला देत होते. ते वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकत होते आणि येऊ शकत होते.
राजा कोणालाही मृत्युदंडाची शिक्षा देत नसे आणि शारीरिक दंड सुद्धा दिल्या जात नसे. ज्याचा जसा गुन्हा असेल त्या पद्धतीची त्याला त्याची आर्थिक परिस्थिती पाहून दंड दिल्या जात असे. नेहमी नेहमी चोरी करणाऱ्यांना हात तोडण्याची शिक्षा दिल्या जायची.
राजाचे सर्व कर्मचारी हे पगारी होते. तेथे राहणारे सर्व लोक जीव हिंसा आणि मद्यपान करीत नसे आणि लसन,कांदा सुद्धा खात नसे. केवळ चांडाल लोक लसण आणि कांदा खात होते.
हे लोकं म्हणजे मनुस्मृति मधील चांडाळ नव्हे. मनुस्मृति मध्ये जर एखाद्या शुद्राने ब्राह्मण स्त्री सोबत विवाह केला तर त्याला होणाऱ्या संततीला चांडाळ म्हटल्या जात असे.
परंतु या ठिकाणी चांडाळाचा अर्थ मनुस्मृति मधील अर्थ घेता येत नाही. कारण त्यावेळेस वर्णव्यवस्था अस्तित्वातच नव्हती. राजा बुद्धिस्ट होता प्रजा ही बुद्धिस्ट होती. परंतु जे दस्यू होते सतत चोरी चोरी करणाऱ्यांना त्यावेळी दश्यू म्हणत) या चोरांनाच त्यावेळी चांडाळ म्हटल्या जात होते. या लोकांना शहरात येण्याची परवानगी नसायची ते जंगलातच राहत होते.
जेव्हा या चांडाळंना शहरात येण्याची गरज पडत होती तर सूचना म्हणून लाकडे वाजवत यावे लागत असे, त्यामुळे लोक यांच्यापासून सावध राहून सुरक्षित अंतरावर राहत असे. चांडाळ डुक्कर आणि कोंबड्या पालनाचा व्यवसाय करीत असे. जिवंत प्राणी सुद्धा ते विकायचे. दारूची दुकाने अस्तित्वात नव्हती. क्रय विक्राय कवडीच्या स्वरूपात होत असे. चांडाळ केवळ मच्छीमारी ,शिकार आणि मास विकण्याचे काम करायचे.
भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर जनपदाच्या सर्व राज्यांनी आणि धनाड्य लोकांनी भेकखुना राहण्यासाठी बुद्ध विहारे बांधली होती. शेती, घर, जंगल भिक्खु संघाला दान दिल्या जायची. दानपत्र हे ताम्रपत्रावर कोरलेले असायचे. प्राचीन काळापासून चालत आलेले ही प्रथा आजही चालू असल्याचे त्याला दिसून आले.
आजही त्याचप्रमाणे विहारांमध्ये संघाला खान-पान मिळत असल्याचे त्याला दिसून आले. कपडे सुद्धा मिळत होते. येणाऱ्या जाणाऱ्याला वर्षावासामध्ये घर सुद्धा मिळत असे.
श्रमणाचे कार्य धर्मोपदेश करणे, सूत्राचे पठण करणे आणि ध्यान करणे . नवीन भिक्खू तेथे जरा आले तर त्यांना सन्मानाने घेऊन येऊन त्यांची राहण्याची व्यवस्था करणे. त्यांचे भिक्षापात्र आणि वस्त्र ते स्वतः आणत असे. पाय धुण्यासाठी पाणी आणि डोक्याला लावण्यासाठी तेल त्यांना देण्यात येत असे. आराम झाल्यानंतर त्यांना विचारल्या जात असे की तुम्ही किती दिवसापासून प्रवच्जा ग्रहण केली आहे. मग त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना राहण्यासाठी रूम दिल्या जात असे आणि त्यानुसारच त्यांच्यासोबत व्यवहार केल्या जात असे.
जिथे भिक्खु संघ राहत असे त्या ठिकाणी सारीपुत्र, महामौदल्यायन, महाकाश्यप यांचे स्तूप बनवलेले होते आणि तिथेच अभिधर्म विनय आणि धम्म स्तूप सुद्धा होते.
वर्षावासाच्या समाप्तीनंतर उपासक लोक भिक्खूंना दान दक्षिणा देण्याची स्पर्धा करीत असे. सारी पुत्ताच्या स्तूपाची पूजा होत होती. रात्रभर दीप मालिका आणि गीत वाद्य चालत होते.
सारीपूत्त हा कुलीन ब्राह्मण होता.(आजचा जातीयवादी आणि ब्रम्हाच्या मुखातून जन्मलेला ब्राह्मण नव्हे, त्यावेळी विद्वान भिक्खूंना बमन म्हटल्या जायचे आज भ्रम वाद्यांनी बमनचा ब्राह्मण केलेला आहे.) सर्व महिला भिक्खु आनंदाच्या स्तूपाची पूजा करायच्या, कारण आनंदानेच महिलांना भिक्खु संघामध्ये तथागत बुद्धांनी घ्यावे याची प्रार्थना केली होती. श्रमनेर राहुल याची सुद्धा पूजा करीत होत्या. (राहुल म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा मुलगा)
बौद्ध पंथाचे अनुयायी प्रज्ञापारमीता, मंजुश्री आणि अवलोकितेश्वर यांची पूजा करीत होते. म्हणजे फाह्यान जेव्हा मथुरेला आला तेव्हा त्याला म्हणजे चौथ्या शतकात मथुराही संपूर्ण बौद्धमय असल्याचे दिसून आले. यावरून हे स्पष्ट होते की मथुराही श्रीकृष्णाची नसून बुद्धाची धरती होय.(संदर्भ: फाह्यान की भारत यात्रा, पृष्ठ क्रमांक 103 ते 106, अनुवाद: जगमोहन वर्मा, संपादक: शांतीस्वरूप बौद्ध, प्राक्कथन,: डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह)
फाह्यानला कुठेही श्रीकृष्णाचे मंदिर, श्रीकृष्णाच्या मुर्त्या किंवा त्यांचे अनुयायी दिसले नाही. आज भ्रमवादी लोकांनी मथुरा या बुद्धाच्या नगरीवर बेकायदेशीर कब्जा केला हेच यावरून सिद्ध होते.
प्रा. गंगाधर नाखले
30/11/2024
7972722081,9764688712