

ककूसंध हे 25 वे बुद्ध आहेत. ककूसंध बुद्धा च्या गावाची पहिली ऐतिहासिक यात्रा(भेट) सम्राट अशोक याने केली होती. तिथे त्याने स्तूप बनविले आणि स्तंभ सुद्धा उभारला. दुसरी यात्रा फाह्यान(चौथ्या शतकात) याने केली होती.
फाह्यान लिहिले आहे की श्रावस्ती नगराच्या बारा योजन अंतरावर ” नपीइ किया ” नावाचे गाव आहे. हेच ककुसंध बुद्धाचे जन्मस्थान होय. तिसरी यात्रा व्हेनसॉंग याने सातव्या शतकात केली होती आणि सर्वांनी ककूसंध बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रमाणित पुरावे दिले आहे.
ककूसंध बुद्धा च्या स्मृती प्रित्यर्थ अशोक सम्राटाने जो स्तंभ उभारला होता, तो आज पूर्णच्या पूर्ण आढळत नाही. तरीपण 3.25 मीटर उंचीचा स्तंभ आजही तेथे आपणास पहावयास मिळतो. ककूसंध बुद्ध यांच्या स्मृतिपत्यार्थ अगोदर बनलेला स्तूप होता, त्याचा जिर्णोद्धार आणि विस्तारीकरण अशोक सम्राट ने केले होते, त्याचा व्यास नंतर 22 मीटर करण्यात आला होता.
ककुसंध बुद्ध यांच्या गावाचा शोध इतिहासकारांनी अतिशय मेहनतीने घेतला होता. हे गाव नेपाळ च्या वाणगंगा नदीच्या डावीकडे लोरी ची कुदान आणि गोटिहवा गावांच्या मध्ये आहे.
गोटीहवा गावचे खोदकामात ककुसंध बुद्धाचा स्तूप सापडला. या स्तूपाची कार्बनडिटिंग करण्यासाठी नमुने मियमी येथे पाठविण्यात आले होते.
मियामी फ्लोरिडा मधील मोठे शहर आहे. तेथील Beta Analytic Radiocarbon Dating Laboratory ने आपला रिपोर्ट दिला आहे, त्या रिपोर्ट मध्ये या स्तूपाचा कालखंड 800 इसापूर्व सांगितलेला आहे.
कार्बन डेटिंग द्वारे ककुसंध बुद्धा यांचा स्तूप हा ईसा पूर्व 9 व्या शतकातील सांगितले जाणे एकदम तंतोतंत बरोबर आहे. जर बुद्धांच्या परंपरेतील 25 वे बुद्ध ककूसंध बुद्धाचा कालखंड ईसा पूर्व नवव्या शतकातील आहे तर मग निश्चितपणे चौथे बुद्ध दिपांकर बुद्धाचा कालखंड सिंधू संस्कृती च्या समकालीन निश्चितपणे असेल.
दीपंकर बुद्धा चा बोधी रुक्ष पिंपळ होता. त्यामुळेच सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये पिंपळाच्या पानाचे नमुने सापडल्यामुळे त्या संस्कृतीमध्ये पिंपळ हे पवित्र समजल्या जात होते हे सिद्ध होते.(संदर्भ: बौद्ध धर्म: मोहेंजोदडो हडप्पा नगरों का धर्म, स्वपन कुमार बिस्वास ,पृ.क्र.10, मराठी अनुवाद: प्रा. गंगाधर नाखले)
भ्रमवादी इतिहासकारांनी आपल्याला अत्यंत भ्रमात पाडणारा इतिहास शिकवलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धापासूनच धम्माची सुरुवात झाली,त्यापूर्वी धम्म अस्तित्वातच नव्हता असे आपणास सांगितले गेले. भ्रमवाद्यांनी सांगितलेला हा इतिहास खोटा असून 4500 वर्षांपूर्वी ची सिंधू संस्कृती उत्खननामध्ये सापडलेली संस्कृती ही पूर्णपणे बुद्धिस्ट संस्कृती होती हे आता सिद्ध झालेले आहे.
– प्रा. गंगाधर नाखले
797272281