बौद्धमय भारत

भारताच्या राष्ट्रपती भवनाची निर्मिती बुद्धिस्ट गृह वास्तुशास्त्र पद्धतीची

कोलकाता ही ब्रिटिश कंपनीचे तत्कालीन भारतीय साम्राज्याची राजधानी होती. ब्रिटिशांनी कोलकाता येथील राजधानी उचलून 1911 मध्ये दिल्ली येथे आणली.
लुटियन हा वास्तुशास्त्राचा तज्ञ होता. त्याने नवी दिल्ली चे निर्माण कार्य करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या नगराचे आधुनिक संस्थापक बेकर याला सुद्धा दिल्ली निर्माण कार्या मध्ये सहभागी करून घेतले होते. नवी दिल्ली मधील महागड्या व्यापारी परिसराचे निर्माण कार्य कनाट प्लेस येथे केले. संसद भवन सचिवालयाच्या जवळील उत्तरी भवन आणि विजय चौक बनविण्यात आले.
व्हाईसरॉय भवन मधून एक सरळ आणि शानदार सडक बनविल्या गेली (आता या सडकेचे नाव राजपथ आहे). आता या विशाल भावनाला राष्ट्रपती भवन म्हणून ओळखल्या जात आहे. हे भारताचे प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपतीजी यांचे निवासस्थान आहे. या राष्ट्रपती भवनाचे निर्माण कार्य लुटियन आणि बेकार यांनी केले आहे. या दोघांनीही राष्ट्रपती भवनाचे निर्माण कार्य युरोपीय नगराची शिल्प पद्धती नुसार केलेली नाही. सर्वत्र मोघलांचे साम्राज्य असताना सुद्धा मुघल शिल्पकला पद्धतीने राष्ट्रपती भवनाची निर्मिती केली नाही. या दोघांनीही राष्ट्रपती भवनाचे निर्माण कार्य बौद्ध गृहनिर्माण पद्धतीने बनविले.
राष्ट्रपती भवनाच्या डोक्यावर शीर्ष काळ्या ग्रॅनाईट दगडाचा विशाल घुमट रायसेन मध्ये स्थित असलेल्या सांचीच्या बौद्ध स्तुपाची प्रतिकृती आहे. सांची स्तुपाची निर्मिती बौद्ध सम्राट अशोक महान याने ईसा पूर्व तिसऱ्या शतकामध्ये प्रसिद्ध दक्षिणेच्या व्यापारी मार्गावर विदिशा जवळील एका उंच पहाडाच्या टेकडीवर केले होते.
राष्ट्रपती भावना भोवती ज्या भिंती उभारलेल्या आहेत त्यावर सुद्धा बुद्धिस्टांचे शिल्पांकन आहे. राष्ट्रपती भावनांमध्ये एक अशोक कक्ष (हॉल )सुद्धा आहे.
भारताचे राष्ट्रपती भवन हे बुद्धिस्ट गृह वास्तुशास्त्रानुसार उभारण्यात आलेले भवन आहे.(संदर्भ: पृष्ठ क्रमांक 58)
प्रा. गंगाधर नाखले
7972722081

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 7   +   2   =