

आज भारत जगातील सर्वात अधिक अनपढ लोकांचा देश बनलेला आहे, परंतु भूतकाळामध्ये भारत असा नव्हता. याउलट या गोष्टीचे आवश्यक तेवढे प्रमाणित पुरावे आहेत की सर्व कालखंडामध्ये भारताच्या विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जगातील सर्व विद्यार्थी स्पर्धा करीत होते.
भारत हा जगातील सर्वात निवासी शिक्षण देणारा विकसित देश होता. असुर जाती (भारतातील सर्व आजचे बहुजन हिंदू) आणि सम्राटांची सर्वाधिक प्राचीन सभ्यता, सांस्कृतिक वारसांचा देश भारताने पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वाणिज्य (व्यापार) संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये देवाण-घेवानाची व्यवस्था कायम केली होती.
भारताचे पणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी 3000 ते 2000 वर्षे ईसा पूर्व बेबीलोन, सुमेर, बीबोल, सीडोन्ट, इत्यादी देशांच्या यात्रा (प्रवास) केला होता.
परंतु बौद्ध धम्माचा ही प्रकाशमान संस्कृतीचा तेजस्वी इतिहासाचा हा मार्ग ब्राह्मणवादी वैदिक काळातील अशिक्षित संस्कृतीच्या अंधकारामध्ये तृप्त होऊन गेली.
उत्तरार्धातील युरोपीय नोकरशहा इतिहासकारांनी मोठ्या कठीण परिश्रमातून जोखीम पत्करून भारतीय संस्कृती आणि येथील लोकांचा इतिहास पुन्हा लिहिण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन करून मिळालेल्या सामग्रीचे संकलन आणि प्रकाशन केले.
या प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या विषयातील तज्ञ असलेल्या काही विदेशी विद्वानांनी इतके स्पष्ट पुरावे शोधून काढले की बौद्ध धम्माच्या निर्विवाद अस्तित्वाचे संकेत मिळत आहे.
असेच काही पूर्व बुद्धांचे संकेत, ज्या मधून शाक्य सिंह गौतम बुद्ध यांच्या पूर्वी चे पूर्व बौद्ध धम्मा हे पुरातत्त्व विज्ञान संबंधी संशोधनामुळे प्रकाशात आले.
जातक कथा आणि इतरही बौद्धपाली साहित्यामध्ये पूर्व बुद्धांचे अनेक संदर्भ आलेले आहे. परंतु विभिन्न जातात कथांमध्ये आलेले पूर्व बुद्धांच्या संदर्भाची व्याख्या अचानकपणे विद्वानांनी हे सांगून नकार दिला की या केवळ पौराणिक उल्लेख आणि काल्पनिक कथा आहे काल्पनिक कथा आहे.
याला गंभीर स्वरूपात ऐतिहासिक पुराव्याच्या स्वरूपात घेतलेले नाही. याला अवास्तविक म्हणून दुर्लक्ष केल्या गेले. ब्राह्मणवादी लेखक आणि इतिहासकारांनी सुद्धा पूर्व बुद्धांच्या संदर्भाला बोधिसत्वांच्या कथा म्हणून सांगितल आणि भ्रमाची स्थिती निर्माण केली की या कथा स्वयम गौतम बुद्धाच्या पूर्व जन्मातील कथा आहे.
प्रा. गंगाधर नाखले
05/12/2024