

बौद्ध परंपरेमध्ये कुंभ बुद्धत्वाचे प्रतीक असते. अज्ञानी आणि मूर्ख लोकांच्या मनाला अर्धे भरलेल्या कुंभाच्या स्वरूपात दाखविले जाते आणि बुद्ध, बोधिसत्व आणि अहरत यांच्या मनाला पूर्ण कुंभच्या रूपामध्ये दाखविल्या जाते.( सुत्त निपात 721)
बोधी प्राप्त करण्यासाठी मनाला अगोदर संसारिक दृष्ट भावनांना रिकामे करावे लागते आणि मग त्यामध्ये बोधीज्ञान भरावे लागते.
पूर्ण कुंभ म्हणजेच पूर्ण कलश बुद्धाच्या ज्ञानाचे प्रतीक होय. म्हणून त्याला ज्ञान कुंभ सुद्धा म्हणतात. त्याच्या अंदर बुद्ध ज्ञानाचा खजिना असतो आणि तो सर्व इच्छा पूर्ण करतो.
बौद्ध स्तूपाप्रमाणेच मंदिराच्या वर सुद्धा कलश ठेवल्या जात आहे आणि त्याला अमृत कलश म्हटल्या जात आहे, कारण की तो अमरता प्रदान करीत असते. निर्वाण हे अमरतेचे प्रतीक आहे. म्हणून त्याला अमृत कलश म्हटल्या जाते (महानिर्वाण सूत्र V.181)
यावरून स्पष्ट होते की मंदिरावरील कलश सुद्धा बौद्ध प्रतीक आहे.(छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्म से संबंध, पृष्ठ क्रमांक 137,138)
प्रा. गंगाधर नाखले
08/12/2024
7972722081