बौद्धमय भारत

हिरण्यगर्भ विधी हा बुद्धिस्टांचा दीक्षाविधी होय.

हिरण्यगर्भ विधी हा बुद्धिस्टांचा दीक्षाविधी होय.
बौद्ध दीक्षा विधीलाच ब्राह्मणांनी उपनयन संस्कार हे नाव देऊन त्या विधीला हिरण्यगर्भ विधी असे म्हटल्या जाऊ लागले. हिरण्यगर्भ हे धर्माचे(धम्माचे)प्रतीक आहे आणि गर्भ याचा अर्थ तथागत गर्भ असा होते, म्हणजेच हिरण्यगर्भ विधी अर्थात तथागत गर्भालाच विकसित करून बुद्धत्व प्राप्तीकडेच अग्रेसर करणे होय.
सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे की या हिरण्यगर्भ विधीचा उल्लेख वेदा मध्ये आणि उपनिषदांमध्ये सापडत नाही.
वेदांमध्ये सर्वात शेवटी लिहिल्या गेलेला वेध म्हणजेच अथर्ववेद (XI,5,6) मध्ये पहिल्यांदा या विधीचा उल्लेख मिळालेला आहे.(Rights and Symbols of Initiation the Mysterrues of Birth and Rebirth, by-Mircea Eliade,PP.53)
यावरून सिद्ध होत आहे की, हिरण्यगर्भ वैदिक ब्राह्मणांनी बौद्धांपासून चोरी केलेला आहे. हिरण्यगर्भ विधी पहिल्यांदा अथर्ववेदाच्या परिशिष्टामध्ये आढळून येते आणि हा ग्रंथ अगदी आधुनिक आहे.
बुद्धांच्या प्रभावामुळे हिरण्यगर्भ विधी सुरुवातीला दक्षिण भारतामध्ये आणि आसाम मध्ये केल्या जात होता. या विधीमध्ये मातृदेवतेचे तीन प्रतीक गाय, गर्भ आणि कुंभ याचा उपयोग होत होता.
भारत आणि बोर्निया मध्ये बुद्धमाता महामाया हिलाच कुंभाच्या स्वरूपात दाखविल्या जाते. भारतामध्ये कुंभालाच महामायेच्या गर्भाचा प्रतीक समजल्या जाते. त्यामुळेच दक्षिण भारतामध्ये गर्भवती महिला महामायेच्या गर्भाची कुंभाच्या रूपामध्ये पूजा करीत होते आणि तिला लज्जा गौरी म्हटल्या जात होते.
लज्जा गौरी चे शिल्प औरंगाबादच्या बौद्ध गुफा आणि दक्षिण भारताची बौद्ध गुफा मध्ये आढळून येते. महामायेची दक्षिण भारतामध्ये गौरम्मा किंवा गोबेम्मा या ग्रामदेवतेच्या रूपामध्ये पूजा केली जात आहे. आणि तिलाच गोमाता च्या रूपामध्ये पुजल्या जाते.
बुद्ध गोतम (बैल) आहे आणि त्याची माता प्रजापिता गौतमी गोमाता आहे.(Vicssitudes of Goddess, by- Sree padma,PP.96,105)
गौरी किंवा गौतमी अर्थात हिरण्य रंगाची गाय असा त्याचा अर्थ होतो आणि तिची पूजा हिरण्य (पिवळ्या रंगाची) हळदीने केली जाते. (उपरोक्त, पृ.109) यावरून सुद्धा स्पष्ट होते की हिरण्य गर्भविधी बुद्धाच्या जन्माचा प्रतिक आहे.
तथागत बुद्धालाच उगवत्या सूर्याच्या रूपामध्ये पिवळा दाखविल्या जात आहे म्हणून दक्षिण भारतात ज्या स्त्रिया वसुबारस दिन, दिवाळीमध्ये गौतमी आणि बालक बुद्धाची गोमाता आणि तिचे पिल्लू (वासरू) च्या स्वरूपात पूजा करीत आहे आणि त्यासाठी ताटामध्ये पिवळ्या हळदीचा उपयोग पूजेमध्ये केल्या जात आहे.(उपरोक्त, पृ.109)
हेच कारण आहे की, हिरण्यगर्भ विधी दक्षिण भारतामध्ये राजे लोक सुद्धा करत होते. कारण तो बौद्ध विधी होता. बुद्धिस्ट राजांचे ब्राह्मणीकरण करण्यासाठी ब्राह्मणांनी हिरण्यगर्भ बौद्ध विधी चे ब्राह्मणीकरण केले आणि त्या माध्यमातून राजांचे सुद्धा ब्राह्मणीकरण केले.
मत्स्यपुराण 295.20 आणि भविष्योत्तर पुराण 176.43 मध्ये बौद्ध हिरण्य गर्भ विधीला ब्रह्मासोबत जोडलेले आहे. चौथ्या शतकाच्या नंतर दक्षिण भारताची राजा अत्तीवर्मन ने आपल्या ताम्रपत्रांमध्ये स्वतःला हिरण्यगर्भ प्रसव अर्थात हिरण्यगर्भातून ज्यांनास आलेला, राजा असे म्हटलेले आहे.
याच प्रकारे सन 543 मध्ये चालुक्य राजा पुलकेसीन प्रथम याने स्वतःला हिरण्यगर्भ संबोधित केले आहे. त्याचा पुत्र मंगलेश याने सुद्धा स्वतःला हिरण्य गर्भ म्हणून सादर केले आहे. (The right of Hiranyagarbha:Ritual Rebirth of social acceptance, by jayanta Bhattacharya, PP.1) यावरून समजून येते की ब्राह्मणांनी बौद्धांच्या या विधीला चोरून त्याद्वारे बुद्धिस्ट राजांचे ब्राह्मणीकरण केले आहे.
(संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्म से संबंध, लेखक: डॉ. विलास खरात, डॉ. प्रताप चाटसे, मराठी अनुवाद: प्रा. गंगाधर नाखले)
प्रा. गंगाधर नाखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 10   +   10   =