स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आत्मचरित्रांमध्ये म्हटलेले आहे की,” जगन्नाथाचे आजचे मंदिर हे पूर्वीचे बुद्ध विहार होय.”(तुमच्या खात्रीसाठी त्यांच्या आत्मचरित्राची फोटोकॉपी खाली देत आहे आपण पाहू शकता.)
आजच्या ओरिसा प्रदेशाचे नाव सातव्या शतकामध्ये ‘ उद्र ‘ किंवा ‘ ओद्र ‘ असे होते. याचेच दुसरे नाव ‘ उत्कल ‘सुद्धा आहे. ( पहा महाभारत ,विष्णुपुराण) ही माहिती सातव्या शतकात भारतात आलेल्या व्हेनसाँग याने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेली आहे.
हा हेनसॉंग ओरिसा (उच, उद्र ) मध्ये जेव्हा जातो तेव्हा तो लिहितो,” यांची भाषा आणि शब्दावली मध्य भारता पेक्षा वेगळी आहे. हे लोक विद्येवर प्रेम करणारे आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी ते कठोर परिश्रम करीत आहे. सर्वाधिक लोक बुद्ध धर्माचे प्रेमी आहे. म्हणून तेथे 100 संघाराम (बौद्ध यांचे आराम करण्याचे ठिकाण) 10,000 भिक्खू तेथे राहत आहे.
हे भिक्खू महायान पण महायान पंथा नुसार आचरण करीतअसून 50 देव मंदिर (महायान पद्धतीच्या बुद्ध विहाराला देव मंदिर म्हटल्या जात असे) सुद्धा आहे. या देव मंदिरामध्ये सर्व प्रकारचे परस्पर विभिन्न विचारसरणीचे लोक राहत आहे..
तिथे जवळपास स्तूपाच्या संख्या 10 असेल. तेथील लोकांनी त्याला त्या त्या जागेचा पत्ता दिला की जेथे जेथे भगवान बुद्ध यांनी आपल्या धम्माचा उपदेश दिला होता तेथे तेथे सम्राट अशोकाने स्तूप बांधले होते.
या प्रदेशाच्या दक्षिण पश्चिम सीमेवरील एका मोठ्या पहाडामध्ये एक सांगाराम आहे की ज्याचे नाव ‘ पुष्पंगिरी ‘ आहे. उपोसथ या दिवशी तेथे मोठा उत्सव असतो. उत्तर पश्चिम दिशेला एका पर्वताच्या वर (कनिंघम महोदय या दोन्ही पहाडांना उदयगिरी आणि खंडगिरी म्हणून निश्चित केले आहे, तेथे अनेक गुफा असून त्यामध्ये अनेक शिलालेख सुद्धा सापडलेले आहे. हे पहाड कटक पासून 20 मैल दक्षिणेमध्ये भुवनेश्वर मंदिर समूहाच्या पश्चिमेला पाच मैल अंतरावर आहे)एका संघाराम मध्ये स्तूप आहे.हे दोन्ही स्तूप देवांनी(भिक्खू यांनी) बनवलेले आहे याच कारणामुळे याचा विलक्षण प्रभावाने भरलेले आहे.
या नगराच्या बाहेर पाच संघाराम एकामागे एक असे बनलेले आहे आणि ते अतिशय उंच आहे त्यामध्ये भिक्खूंच्या अतिशय सुंदर मूर्ती तेथे सुसज्जित आहे.
येथून 20,000 ली गेल्यानंतर श्रीलंका लागतो. जर वातावरण स्वच्छ आणि शांत असले तर इतके बुद्धदंत स्तूपाचे बहुमूल्यरत्न इत्यादी असे चमकताना दिसतात की की आकाशामध्ये सर्वत्र मशाली जळत आहे. (संदर्भ: व्हेनसॉंग की भारत यात्रा, लेखक: व्हेनसॉंग, अनुवाद: ठाकूर प्रसाद शर्मा, संपादक: शांतीस्वरूप बौद्ध, प्राक्कथन: डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह, पृष्ठ क्रमांक 368, 369, मराठी अनुवाद: प्रा.गंगाधर नाखले)
व्हेनसॉंग याला संपूर्ण ओरिसा फिरल्यानंतर कुठेही जगन्नाथाचे मंदिर दिसले नाही जर ते अस्तित्वात असते तर त्याला ते दिसले असते आणि ते त्याने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवले असते. या नगराच्या बाहेर जे पाच मोठे उंच संघाराम होते त्यापैकी एकाचे परिवर्तन जगन्नाथ मंदिरामध्ये केलेले आहे असे मत ब्रिटिश कालीन पुरातत्त्व विभागाचे प्रमुख मेजर जनरल कनिंघम यांनी आपल्या पुस्तकांमध्ये पुराव्यासह व्यक्त केलेले आहे.
प्रा. गंगाधर नाखले
14/12/2024
7972722081,9764688712
Post Views: 56,426