डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर हे दोघेही नोव्हेंबर १९५३ ला दिल्ली हुन मुंबई ला फ्रंटियर मेल या रेल्वे ने प्रवास करत होते मोटारिने बंगल्याहुन स्टेशन ला आल्यावर गाडीतून उतरताना साहेबांच्या हाताची बोट गाडीच्या दारात चेपली आम्ही तसेच गाडीत बसलो थंडीचे दिवस होते आणि कड्याक्याची थंडीही वाजत होती थंडी असल्याने त्यांच्या बोटात तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या गाडी वेगात चालली होती मी चौकशी केली तेव्हा रतलाम स्टेशन यायचे होते साहेबांच्या अंगात खुप ताप भरला होता मोटारीतुन उतरताना दारात बोटे चेपल्याने केवळ निमित्त मात्र झाले ताप सारखा चढतच होता तापातच साहेब बडबडायला लागलेत ” शरु आय व्हांट टू गो ” त्यांचे हे बडबडने एक सारखे चालूच होते मी जरी डॉक्टर होते तरी मला याचा अर्थ कडत नव्हता मी त्याना “कोडो-पायरीन” ची एक गोळी दिली तसेच त्यांच्या कपाडावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागल्या :त्यांना काहीही कळत नसावे त्यांचे एकच वाक्य बोलने चालू होते ” शरु आय व्हांट टू गो ”
गोळी दिल्यावर त्यांचे अंग थोडे थंड झाले ताप थोडा उतरला परंतू त्यांचे ” शरु आय व्हांट टू गो, लेट मी गो ” हे त्यांचे बडबडने थांबतच नव्हते त्यामुळे मला चिंता आणि भिती वाटू लागली. मला काय करावे ते कळेनासे झाले रतलाम स्टेशन यायचेच होते त्यांना रतलाम ला उतरुन घ्यावे की मुंबई ला न्यावे, की रतलाम वरुन पुन्हा दिल्ली ला न्यावे हे मला कळेना पण थोड्यावेळाने त्यांचा ताप पुर्णपणे उतरला त्यामुळे सरळ मुंबई ला जायचे मी ठरवले साहेबही आता शुद्धीवर यायला लागले होते त्यांना घडलेली हकीकत सांगितली ते ऐकुन साहेब सुद्धा चिंताग्रस्त झालेत मुंबई सेंट्रल ला आम्ही उतरलो. स्टेशन वर कमलाकांत चित्रे आणि सोसायटीचे काही मंडळी आम्हाला घेण्यासाठी आलेले होते साहेबांची मनस्थिती काही ठीक वाटत नव्हती आमच्यात चित्रे जरा अनुभवी व जरा जास्त वयस्क होते म्हनून मी त्यांना एका बाजूला घेऊन प्रवासात घडलेल्या घटने बाबत सांगितले तसेच ते एक सारखे ” शरु आय व्हांट टू गो ” असे बडबडत होते म्हणाले सांगितले हे एकून चित्रे गंभिर झाले आणि म्हणाले “हे काही चागले लक्षण नाही, आपण साहेबांची विषेश काळजी घ्यायला हवी. ” मी त्यांना सुचविले साहेबांना चांगल्या नर्सिंग होम मध्ये घेऊन जाऊ या ! त्यावर चित्रे म्हणाले ” साहेबांना नर्सिंग होम मध्ये ठेवण्यापेक्षा आपण त्यांच्या साठी स्पेशल नर्स ठेवू ” आमची राहायची सोय लिबर्टी सिनेमा जवळ च्या मिराबेल होटेल मध्ये करण्यात आली होती मुंबई सेंट्रल वरुण आम्ही सरळ मिराबेल होटेल ला गेलो होटेल ला पोहोचल्यावर साहेबाना श्वसनाचाही त्रास होऊ लागला चित्रे यांनी ताबडतोब एका नर्सची व्यवस्था केली इतकी प्रकृती गंभिर असुनही साहेब सोबतच्या मंडळी बरोबर सारखे गप्पा करत होते रुम च्या बाहेर ठेवलेल्या कोच वर बसुन ते बोलत होते आम्ही त्यांना आराम करण्याची विनंती करत होतो पण त्यांच आपल बोलन चालूच होत इतक्यात नर्स तिथे आली आणि साहेबांच्या दंडाला धरून म्हणाली ” डॉ आंबेडकर सर यु हॅव टॉक इनफ, यु हॅव टु टेक रेस्ट नॉव ” त्यावर साहेब म्हणाले ” नो सिस्टर आय एम ऑल राइट! ” नर्स ने दोन्ही दंड धरुन उठवित म्हटले ” नो यु नीड टू रिस्क नॉव ” आणि त्यांच्या दोन्ही हातांना पकडून अक्षरशा आत नेले आणि पलंगावर आराम करण्यास सांगितले पण साहेब स्वस्ठ झोपुच शकत नव्हते त्यांना श्वसनाचा त्रास जास्तच होऊ लागला होता मला चिंतेने अधिकच ग्रासले मी माझी चिंता चित्रेना बोलूण दाखविली तेव्हा चित्रे म्हणाले ” काळजी करु नका, आपन पुर्ण वेळ नर्स ठेवू नामवंत डॉक्टरांना सुद्धा बोलवू  ” त्या प्रमाणे चित्रे नी डॉ मालवनकर आणि विख्यात हृदय रोग तज्ञ डॉ तुळपुडे यांना फोन करुन त्वरीत मिराबेल होटेल ला यायची विनंती केली. डॉ तुळपुडे साहेबांचे स्पेशल डॉक्टर होते या आधिही श्वसनाच्या त्रासासाठी व रक्तदाबासाठी त्यांनी साहेबांना अनेकदा तपासले होते तसेच त्यांचे उपचार ही चालू होते डॉ तुळपुडे मिराबेल होटेल ला आले तेव्हा लाजेने मी आतल्या खोलीत जाऊन लपले त्याला कारण असे की मी एम बी बी एस ला असताना ग्रॅन्क मेडीकल कॉलेज ला ते माझे वर्ग शिक्षक होते त्यांच्या समोर यायला मला लाज वाटत होती कारण साहेबांचे वय केवढे आणि मी अगदीच लहान दिसत होते त्यामुळे मला डॉ तुळपुडे यांच्या समोर यायला लाज वाटत असे म्हणूनच मी त्यांच्या समोर येत नसे डॉ तुळपुडे यांनी साहेबांना तपासले आणि त्वरीत ऑक्सिजन ( प्राणवायु ) लावण्याचा सल्ला दिला त्यांच्या म्हनल्याने त्वरीतच ऑक्सिजन चे दोन सिलेंडर मागविले डॉ तुळपुडे यानी साहेबांच्या नाकावाटे नळी टाकून प्राणवायू देण्यात आला डॉ तुळपुडे यांनी तपासुन सुचना देऊन आणि औषध उपचाराने निर्देश देऊन निघुन गेलेत साहेबांची स्थिती ही बरोबर दिसत नव्हती ते एकडे तिकडे मान हलवून बघायचे मला बघुन जवळ बोलवायचे मी जवळ गेले की ” सिट हिअर ” म्हणत जवळ बसवून घ्यायचेत आणि परत त्यांचे ” शरु आय व्हांट टू गो ” हे पालुपत सुरू व्हायचे मला हे त्याांचे बोलने चमत्कारीत वाटत असे मला क्षणभर वाटायचे की ते दिल्लि ला जायचे म्हणतात की काय म्हणून मी त्याांस धीर देऊन म्हणत असे काही बोलू नका स्वस्थ पडुण विश्रांती घ्या तुम्हाला बरं वाटल की आपल्याला जायचच आहे तेवढ्यात चित्रे म्हणाले ” ही लक्षणे बरी नाहीत ” त्यामुळे मी अगदी चिंताग्रस्त झालेले होते त्यानंतर सुमारे ३ ते ४ तास ऑक्सिजन चा पुरवठा झाल्यावर त्यांचे ” शरु आय व्हांट टू गो ” हे पालुपत साहेब विसरलेत नंतर त्यांना चांगलीच गाळ झोप लागली सुमारे २४ तास त्यांना सारखा ऑक्सिजन घ्यावा लागला नंतर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले की हा हृदयविकाराचा सौम्य झटका होता सुदैवाने फार मोठे गंडानतर टळले होते मला आजही विचार करुण आंगावर शहारे येतात त्यावेळी मी साहेबाना रतलाम ला उतरवून घेतले असते आणि दिल्ली ला परत नेण्याचा प्रयत्न केला असता तर काय अणर्थ झाला असता. आम्ही मिरा बेल होटेल ला असतानाच त्याकाळात प्रसिद्धी पावलेले थोर चरित्रकार धनंजय कीर साहेबांचा माग काढत येऊन धडकलेत साहेबांचे ऑक्सिजन सिलेंडर ची नळी नुकतिच काढलेली होती साहेब अंथरुना वर पडूनच होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहण्याच्या प्रयत्नात कीर होते ऑल इंडिया रेडीओ मध्ये कामावर असलेले भास्करराव भोसले यांच्या मार्फत साहेबांची सहमती आणि मुलखत करायच्या मार्गात कीर होते, साहेबानी त्यांचे चरित्र लिहन्याची सहमती कीर याना दिली होती त्याप्रमाने कीर यांनी चरित्र ग्रंथ इंग्रजीत पुर्ण करण्यात आणला होता कीरांनी साहेबांची तब्बेतीची चौकशी करुन पुस्तकांच्या सबंधित माहिती साहेबांना सांगितली. नंतर जातीय निवाड्यासंबंधी प्रंतप्रधान मॅक डोनाल्ड याना दिलेल्या निवेदना वर गांधी जी ने सही केली काय ? असा त्यांनी साहेबांस प्रश्न केला साहेब तडकन उठून बसले व म्हणाले ” मी सांगतो गांधीजी नी त्या निवेदनावर सही केलेली होती. सही करण्या पलिकडे ते काय करु शकले असते ? ” साहेब व्देषाने बोलू लागलेत ! म्हणून मला त्यांच्या प्रकृतिची आनखीच काळजी वाटू लागली, मी कीरांना आटोपते घ्या असं सांगितले त्यांनी अधिक प्रश्न न विचारता ती भेट आटोपती घेतली. साहेबांना थोड बर वाटल्यावर आम्ही त्यांना कुलाबा च्या जयराज हाऊस ला हलविले त्यांना खुपच अशक्तपणा आला होता , इतका आला होता की त्यांना आमच्या जयराज हाऊस च्या पहिल्या मजल्यावर खुर्चीवर बसवून त्यांना न्यावे लागले होते ते अतिशय अशक्त आणि विकलांग झाल्यासारखे झालेले होते हे आजारपन त्यांच्या जीवावर बेतने इतके होते, त्यांना स्वत:ही जगण्याची भ्रांत होती . याची कल्पना त्यांनी कदम ला लण्डन ला पाठविलेले पत्र दि. १९ एप्रिल १९५४ पत्रवाचून येईल. साहेब लिहीतात ” तुम्ही पाठविलेल्या पुस्तकांची आणि पुस्तके पाठविलेल्या दोन पत्रासंबंधी तात्परतेने पोहोच न दिल्या बद्दल मी दिलगीर आहे, गेल्या नोव्हेंबर पासुन मी गंभीर रित्या आजारी होतो आणि अनेक वेळा मी माझ्या जगण्याच्या आशा सोडून दिलेल्या होत्या परंतु मी त्यातुनही आता बाहेर आलोय त्याबद्दल मी तथागत गौतम बुद्धांचा आभारी आहे, मला मुंबई ला नेण्यात आलेले होते मी मार्च च्या मध्यापर्यंत पलंगावरच होतो ”

– संदर्भ : – डॉ आंबेडकरांच्या सहवासात
– लेखक : – डॉ सविता आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *